LIVE : ठाणे पोलीस आयुक्त पदी जयजीत सिंग यांची नियुक्ती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 24, 2021, 21:26 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:28 (IST)

  दिल्ली, गुरुग्राममध्ये पोलिसांचं धाडसत्र
  नोटीस देण्यासाठी पोलीस ट्विटर कार्यालयात

  21:21 (IST)

  राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
  राज्यात दिवसभरात 42,320 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 22,122 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 361 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 92.51 तर मृत्युदर 1.59 टक्के
  राज्यात सध्या 3 लाख 27,580 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:57 (IST)

  वन विभागाची आढावा बैठक, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा, पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशी ठिकाणं निवडून तेथील नैसर्गिक स्थळांचा विकास करावा - मुख्यमंत्री

  20:57 (IST)

  वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीनं ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील दोन व लगतच्या एका गावाचं पुनर्वसन करण्यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  20:12 (IST)

  एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा, द्रुतगती महामार्गावरील प्रकल्प, वरळी-शिवडी कनेक्टर, प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टर, कल्याण रिंग रोड या प्रकल्पांचं सादरीकरण

  19:57 (IST)

  नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
  कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली
  दुसऱ्या लाटेत संख्या 1500 वर पोहोचली होती
  'रुग्णसंख्या कमी झाली तरी हुरळून जाऊ नका'
  नवी मुंबईकरांनी काळजी घ्यावी - पालिका आयुक्त

  19:56 (IST)

  पुणे - उद्या महापालिकेची केंद्र लसीअभावी बंद
  खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू राहणार

  18:37 (IST)

  फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसाठी मोठी बातमी
  येत्या 3 दिवसांत बंद होऊ शकतं अकाऊंट - सूत्र
  25 फेब्रुवारी 2021 रोजी दिली नियमावली - सूत्र
  अजूनही नियमांची अंमलबजावणी नाहीच - सूत्र
  देशातील नियमांचं पालन करणं गरजेचं - सूत्र
  नियम डावलल्यास कारवाईचा बडगा - सूत्र

  17:28 (IST)

  अनिल देशमुखांसंदर्भात हायकोर्टात नवी याचिका
  न्यायमूर्ती एस. काथावालांच्या खंडपीठापुढील सुनावणी
  'सुनावणी दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करा'
  'रात्री 9 नंतर उशिरापर्यंत सुनावणीची गरजच काय?'
  इतक्या तातडीनं सुनावणी कोणासाठी? याचिकेत सवाल
  मूळ तक्रारदार डॉ.जयश्री पाटलांची हायकोर्टात याचिका
  'सीबीआयच्या FIR मधील काही भाग वगळा'
  राज्य सरकारची काही भाग वगळण्यासाठी याचिका

  16:51 (IST)

  आरे दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड एसीबीच्या जाळ्यात, 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स