LIVE: आज राज्यात 9371 रुग्ण कोरोनामुक्त तर 9844 रुग्णांचे निदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 24, 2021, 20:05 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  19:59 (IST)

  राज्यात दिवसभरात 9,371 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 9,844 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 197 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 95.93 तर मृत्युदर 2 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 21,767 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:54 (IST)

  गेल इंडिया, वितारा एनर्जीची राज्यात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक; राज्य शासनासोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

  19:33 (IST)

  शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन 2021-22 साठी इतर शुल्कात 16 हजार 250 रुपयांची सूट, सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांना फायदा; उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

  19:20 (IST)

  नरेंद्र मोदींसोबत काश्मिरी नेत्यांनी केली चर्चा
  कलम 370 हटवल्यानंतर प्रथमच झाली बैठक
  8 प्रमुख राजकीय पक्षांच्या 14 नेत्यांसोबत चर्चा
  जम्मू-काश्मीरच्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा
  महबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला होते उपस्थित
  गुलाम नबी आझादांसह प्रमुख नेते होते उपस्थित

  18:58 (IST)

  'वाझेनं पत्रात परबांसह अजित पवारांचं घेतलंय नाव'
  'अजित पवार, अनिल परबांचीही CBI चौकशी करा'
  भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मागणी

  16:56 (IST)

  राज्यात दरदिवशी 3 हजार मे.टन ऑक्सिजन निर्मितीचं उद्दिष्ट, तातडीच्या उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सिजन निर्मिती, साठवणूक क्षमता वाढवावी, मुख्यमंत्र्यांचं ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना आवाहन

  16:29 (IST)

  पोलिसांच्या कार्यक्षमता आणि मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करा - मुख्यमंत्री

  16:24 (IST)

  पोटनिवडणुकीचा हव्यास सोडा - चंद्रकांत पाटील
  'कोल्हापुरात आजही रुग्णसंख्या नियंत्रणात नाही'
  'वझेनं पत्रात परबांसह अजित पवारांचं नाव घेतलंय'
  अजित पवारांचीही चौकशी व्हावी - चंद्रकांत पाटील
  2 दिवसांचं अधिवेशन हा हास्यास्पद प्रकार - पाटील
  पोटनिवडणुका पुढे ढकलाव्यात - चंद्रकांत पाटील
  'उद्या आम्ही निवडणूक आयोगाला भेट देणार'

  16:20 (IST)

  तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचं नियोजन करून जिल्ह्यांना द्यावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आरोग्य विभागाला सूचना, संसर्गाचं अधिक प्रमाण असलेल्या 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी; चाचण्या, लसीकरण वाढवावं, घाईघाईनं निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका - मुख्यमंत्री

  16:12 (IST)

  'मराठा आरक्षण मागणीसाठी 26 तारखेला मेळावा'
  औरंगाबादेत होणार मोठा मेळावा - विनायक मेटे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स