LIVE : कोरोनाचा फटका; नागपूर विद्यापीठाने बीएड प्रथम वर्षाची परीक्षा पुढे ढकलली
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स
Lokmat.news18.com | February 24, 2021, 9:59 PM IST
Last Updated Yesterday
auto-refresh
Highlights
9:59 pm (IST)
बीड - गेवराई तालुक्यातील मातोरीजवळ झालेल्या भीषण अपघातात सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भावोजींचा अपघाती मृत्यू, भरधाव कार पुलाखाली गेल्यानं दुर्घटना, कारचा अक्षरश: चुराडा
9:54 pm (IST)
बीड - 5वी ते 9वीपर्यंत शाळा 10 मार्चपर्यंत बंद
कोरोनाचा संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
नियम पाळा अन्यथा कारवाई -पोलीस अधीक्षक
9:26 pm (IST)
संजय राठोडांच्या राजीनाम्यावर सस्पेन्स कायम
राठोडांनी मंत्रिमंडळ बैठकीला लावली हजेरी
'वर्षा'वर झालेल्या बैठकीतही होते उपस्थित
वनमंत्री संजय राठोड बैठकीनंतर परतले
8:49 pm (IST)
माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला
10 किलोची भूसुरुंग स्फोटकं केली नष्ट
गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
8:41 pm (IST)
मुंबईत दिवसभरात 1167 नवे रुग्ण
मुंबईत दिवसभरात 376 रुग्ण बरे
मुंबईत दिवसभरात 4 जणांचा मृत्यू
मुंबईत 51 कंटेन्मेंट झोन, 815 इमारती सील
8:29 pm (IST)
महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 3 पुरस्कार प्रदान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी व कृषी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान, राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसेंनी स्वीकारला पुरस्कार, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारानं गौरव
250 पर्यंत सदस्यसंख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय, 250 पर्यंत सदस्यसंख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मात्र खुला, इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा सहकार विभागाचा निर्णय
7:36 pm (IST)
राज्यात 15 दिवसांत सर्वाधिक रुग्णवाढ
राज्यात दिवसभरात 8,807 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 2,772 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 80 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.70 टक्के
राज्यात सध्या 59,358 ॲक्टिव्ह रुग्ण
7:02 pm (IST)
कोरोना परिस्थितीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा, संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात, मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणं यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणे, 'मी जबाबदार' मोहिमेची अंमलबजावणी तसेच सर्वांना लसीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आलं