liveLIVE NOW

LIVE Updates: पुणे जिल्ह्यात एक कोटी कोरोना लसीकरण पूर्ण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 23, 2021, 19:31 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:16 (IST)

  आरोग्य विभागाच्या परीक्षांचा सावळागोंधळ थांबेना, तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी निराश

  21:48 (IST)

  मुंबईकरांसाठी खुशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणीपातळीत वाढ, 99 टक्के तलाव भरल्यानं मुंबईकरांची चिंता मिटली

  21:21 (IST)

  औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांना कोर्टाचा दणका, बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट कोर्टाकडून रद्द, औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयानं दिले आदेश, बलात्कारप्रकरणी पुन्हा तपास करण्याचे कोर्टाचे आदेश, पोलिसांच्या तपासावरही ओढले ताशेरे, जिल्हा सत्र न्यायालयाकडून मेहबूब शेख आणि पोलिसांना झटका

  21:16 (IST)
  आसाममध्ये अनधिकृत बांधकामांच्या कारवाईदरम्यान नागरिक आणि पोलिसांमध्ये राडा, पोलिसांच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू, दरांग जिल्ह्यातील ढोलपूर गोरखुटी गावातील घटना
   
  20:15 (IST)

  नाशिक - निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्वीकारणारे लिपिक एसीबीच्या जाळ्यात, मुख्य आणि वरिष्ठ लिपिकाला 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

  19:45 (IST)

  मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, वनक्षेत्रालगतच्या गावातील शेतकऱ्यांसाठी सौर कुंपण योजनेच्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात - उद्धव ठाकरे

  19:36 (IST)

  डोंबिवली - अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे एकनाथ शिंदेंकडून ठाणे पोलीस आयुक्तांना आदेश

  19:28 (IST)

  पुणे जिल्ह्यात एक कोटी लसीकरण पूर्ण
  आतापर्यंत 1 कोटी 14 हजार दिले डोस
  69 लाख 34,250 जणांना दिला पहिला डोस
  30 लाख 80 हजार जणांचे दोन्ही डोस पूर्ण
  पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून लसीकरण वेगानं

  19:21 (IST)

  राज्यात मोफत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ
  अन्न-खाद्य सुरक्षामंत्री भुजबळांच्या हस्ते शुभारंभ
  राज्यात 18 लाख 75 हजार 510 नोंदणीकृत मजूर
  या योजनेंतर्गत मजुरांना मिळणार सकस आहार
  राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू
  या सकस आहारात पोळी-भाजी-डाळ-भाताचा समावेश
  तयार जेवणाचं पॅकबंद डब्यात केलं जाणार वितरण

  18:54 (IST)

  'जि.प.'च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; ग्रामविकास विभागानं 7 तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची केली स्थापना

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स