Live Updates: उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 1 जण गंभीर जखमी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 23, 2021, 23:29 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:12 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण
  राज ठाकरेंना सौम्य ताप आणि लक्षणं
  राज ठाकरेंच्या आई आणि बहिणीलाही लागण
  उद्धव ठाकरेंकडून राज यांच्या तब्येतीची विचारपूस
  तिघांचीही लीलावतीमध्ये झाली आरोग्य चाचणी
  राज ठाकरे लीलावती रुग्णालयातून 'कृष्णकुंज'कडे

  19:52 (IST)

  मविआ सरकारनं ओबीसी आरक्षणाविषयी अध्यादेश काढला, मात्र लगेच याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली, याचिका करणारा भाजपचा जळगावचा सरचिटणीस, त्यामुळे ओबीस आरक्षणाविषयी भाजपची भूमिका दुटप्पी - छगन भुजबळ

  19:49 (IST)

  'सरकारनं ओबीसी आरक्षणाविषयी अध्यादेश काढला'
  मात्र याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका - भुजबळ
  'याचिका करणारा भाजपचा जळगावचा सरचिटणीस'
  ओबीसींविषयी भाजपची भूमिका दुटप्पी - छगन भुजबळ

  17:43 (IST)

  नागपूर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्यांना अटक; 6 जिवंत काडतुसं, एक मोठी तलवार, मिरची पावडर हस्तगत, 6 आरोपींना अटक, रामटेक पोलिसांकडून तपास सुरू

  17:20 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण
  राज ठाकरेंच्या कुटुंबातील तिघांना कोरोना
  राज ठाकरेंच्या आई आणि बहिणीलाही लागण
  उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन
  तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती

  16:50 (IST)

  गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचं बळकटीकरण अत्यावश्यक - सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा
  मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं उद‌्घाटन
  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात वैचारिक अमृतमंथन व्हावं - मुख्यमंत्री
  डिजिटल इंडियासोबतच डिजिटल न्यायव्यवस्था महत्त्वाची - किरेन रिजिजू
  मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं लवकरच भूमिपूजन

  16:48 (IST)

  औरंगाबाद - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या, अन्यथा सत्ताधारी नेत्याच्या घरात दिवाळी होऊ देणार नाही, दिवाळी काळ्या फिती लावून साजरी करू, रस्त्यावर उतरू, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा राज्य सरकारला इशारा

  16:45 (IST)

  अमरावती जिल्ह्यातील दानापूर येथील मागासवर्गीय समाजावरील अन्याय प्रकरण, दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून पोलिसांना आदेश, तातडीनं माहिती घेऊन अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून द्या - दिलीप वळसे पाटील

  16:30 (IST)

  केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा 'जनता दरबार'
  जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी थेट संवाद
  'समाधान हे विकासाला व्यत्यय आणणारं आहे'
  'सर्वच खर्च केंद्रानं करायचा तर हे काय करतायत'
  इथं फक्त स्वत:चं उत्पन्न वाढतंय - नारायण राणे
  भारतीय घटना त्यांनी वाचावी - नारायण राणे
  काय अधिकार, हे आधी समजून घ्यावं - राणे
  कायदा सगळ्यांना समान आहे - नारायण राणे
  'अडीच वर्षांत कळलं नाही, पुढे काय कळणार?'
  हिंदुत्वाला उद्धव ठाकरेंनी दिली मूठमाती - राणे
  संजय राऊतांना अजून हिंदुत्व कळलं नाही - राणे
  एजन्सीज आपल्या अधिकारानं काम करतायत - राणे
  'तपास होईपर्यंत धुतल्या तांदळाचे म्हणता येणार नाही'
  कायद्यासमोर जात-पात-धर्म नसतो - नारायण राणे
  'राज्य सरकार लोकांच्या अडचणी सोडवतात का?'
  काय काम केलंय ते दाखवा, नारायण राणेंचा टोला
  पैसे दिल्याशिवाय काम होत नाही - नारायण राणे

  15:32 (IST)

  हर्षवर्धन पाटलांची मविआ सरकारवर टीका
  'नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत नाही'
  'शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागतेय'
  'मविआ सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय'
  'शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजारांची मदत जाहीर करावी'
  'वीजबिल माफ करा अन्यथा भाजप आंदोलन करणार'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स