Live Updates: एसटी संप: गोपीचंद पडळकर यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 23, 2021, 15:17 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:24 (IST)

  उदय सामंतांच्या B-2 बंगल्यावरील बैठक संपली
  खोत, पडळकरांसोबत उदय सामंतांनी केली चर्चा
  'वेतननिश्चिती, वेतनवाढीवर मसुद्याबाबत बैठकीत चर्चा'
  'कर्मचाऱ्यांच्या एसटी आंदोलनावर तोडगा काढा'
  मुख्यमंत्र्यांच्या सामंतांना सूचना असल्याची माहिती
  एसटी आंदोलन तोडग्यासाठी सरकार लागलं कामाला

  20:59 (IST)

  एसटी आंदोलन तोडग्यासाठी सरकार लागलं कामाला
  अनिल परबांच्या जोडीला आता मंत्री उदय सामंत
  खोत, पडळकरांसोबत उदय सामंत यांची चर्चा
  वेतननिश्चिती, वेतनवाढीवर मसुद्याबाबत चर्चा
  'कर्मचाऱ्यांच्या एसटी आंदोलनावर तोडगा काढा'
  मुख्यमंत्र्यांच्या सामंतांना सूचना असल्याची माहिती
  उदय सामंतांच्या B-2 बंगल्यावर महत्वाची बैठक

  20:6 (IST)

  औरंगाबाद - विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप
  संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई
  9 कर्मचारी बडतर्फ तर 3 कर्मचारी निलंबित
  जुन्यांसह नव्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही समावेश

  20:3 (IST)

  'सह्याद्री'वर मंत्री अनिल परबांसोबत बैठक संपन्न
  गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत होते बैठकीला
  'एसटी संघटनेच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा'
  बैठकीत विलीनीकरणार चर्चा झाली - अनिल परब
  समितीचा अहवाल शासन मान्य करेल - परब
  संपाबाबत अंतिम निर्णय घ्यावा - परिवहन मंत्री
  'अंतरिम पगारवाढीच्या पर्यायावर उद्या चर्चा'
  उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक - परब
  राज्य शासन संप मिटवण्यासाठी प्रयत्नशील - परब
  संपामुळे एसटी, कर्मचाऱ्यांचं नुकसान - परब
  एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा - अनिल परब
  निलंबन विषयावर संप मिटल्यानंतर निर्णय - परब

  सरकारसोबत सकारात्मक चर्चा - गोपीचंद पडळकर
  विलीनीकरणावर आम्ही ठाम - गोपीचंद पडळकर
  'पगारवाढ आणि वेळेवर पगार यावर चर्चा झाली'
  'कोर्ट प्रक्रियेमुळे विलीनीकरणाला वेळ लागणार'
  सरकारनं आज पहिल्यांदा प्रस्ताव दिला - पडळकर
  कर्मचाऱ्यांशी बोलल्याशिवाय निर्णय नाही - पडळकर
  सरकारसोबत सकारात्मक चर्चा - सदाभाऊ खोत
  उद्याच्या बैठकीत कर्मचारी निलंबन मुद्दा घेणार - खोत
  'सरकारनं सहकार्याची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट केली'
  कर्मचाऱ्यांच्या सर्व अडचणींवर चर्चा करणार - खोत
  'आझाद मैदानावर आमचं अहिंसेच्या मार्गानं आंदोलन'

  19:26 (IST)

  काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं राहुल गांधी मुंबईत, राहुल गांधींची 28 डिसेंबरला मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार सभा

  19:13 (IST)

  कृषीपंप वीजतोडीविरोधात भाजप आक्रमक
  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंचा फाशीचा प्रयत्न
  नगरच्या नेवासा वीज वितरण कार्यालयातील प्रकार
  कार्यकर्त्यांनी वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला
  मुरकुटेंची प्रकृती स्थिर, उपचारासाठी रुग्णालयात

  18:53 (IST)

  नवी मुंबई - राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अन्नू आंग्रेंवर गुन्हा, भाऊ राहुल आंग्रेसह एकूण 7 जणांविरोधात गुन्हा, 50 हजारांची खंडणी मागितल्यानं गुन्हा दाखल

  18:38 (IST)

  जिल्हा बँक निवडणूक राड्यानंतर पवार साताऱ्यात
  शरद पवार आणि शशिकांत शिंदेंमध्ये बैठक सुरू
  साताऱ्यातील विश्रामगृहात बंद दाराआड चर्चा

  18:5 (IST)

  ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा

  17:47 (IST)

  'कॉंग्रेस एसटी कर्मचारी युनियनचा एक नवा पर्याय'
  त्रिसदस्यीय समितीला दिला नवा पर्याय - श्रीरंग बरगे
  'बजेट विलीनीकरण केलं तरी कर्मचाऱ्यांना फायदा होणार'
  कोर्टानं गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीसमोर निवेदन

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स