• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: जल आक्रोश आंदोलनासाठी देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत दाखल

Live Updates: जल आक्रोश आंदोलनासाठी देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 23, 2022, 17:00 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  22:39 (IST)

  राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर
  उसाप्रमाणेच आता दुधालाही किमान आधारभूत किंमत
  दुधाच्या MSP निश्चितीसाठी मंत्रिगट उपसमिती जाहीर
  उपसमिती स्थापनेचा जीआर शासनाकडून प्रसिद्ध
  दुधाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी केली होती आंदोलनं

  21:46 (IST)

  दावोस जागतिक आर्थिक परिषदेत सामंजस्य करार
  राज्य सरकारसोबत 30 हजार कोटींचे सामंजस्य करार

  66 हजार जणांना रोजगार मिळणार - सुभाष देसाई

  21:46 (IST)

  दावोस जागतिक आर्थिक परिषदेत सामंजस्य करार
  राज्य सरकारसोबत 30 हजार कोटींचे सामंजस्य करार

  66 हजार जणांना रोजगार मिळणार - सुभाष देसाई

  20:35 (IST)

  नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम; नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, वसई-विरार या अतिमुसळधार विभागातील महापालिकांचाही समावेश

  20:35 (IST)

  नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम; नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, वसई-विरार या अतिमुसळधार विभागातील महापालिकांचाही समावेश

  20:33 (IST)

  राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील प्रलंबित 13 महापालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याची अधिसूचना केली जाहीर, येत्या 31 मे रोजी पालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढली जाणार, 13 महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहणार

  19:53 (IST)

  औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरून भाजप आक्रमक
  फडणवीसांच्या नेतृत्वात काढला जल आक्रोश मोर्चा
  पैठण गेट ते पालिका कार्यालयापर्यंत मोर्चा
  सत्तापरिवर्तन तर होणारच - फडणवीस
  'आजची लढाई व्यवस्था परिवर्तनाची'
  'भ्रष्टाचारी प्रशासनाविरोधात हा मोर्चा'
  'औरंगाबादमधील जनतेचा हा आक्रोश'
  'संभाजीनगरचा माणूस पाण्यासाठी तरसलाय'
  पाण्यावरून मविआ सरकारवर निशाणा
  पाणी येईपर्यंत झोपू देणार नाही - फडणवीस
  दगडाला सोन्याची नाणी समजा - फडणवीस
  'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा'
  'मोर्चा काढताना केवढ्या अटी घातल्या'
  'तुम्ही पोस्टर फाडू शकता, आक्रोश नाही'
  नळ पाण्यासाठी की हवेसाठी? - फडणवीस
  80 वर्षांची आजी हंडा घेऊन होती - फडणवीस
  'या आजीच्या घरात सीएम कधी जाणार?'
  आपण संभाजीनगर का म्हणतोय? - फडणवीस
  1679 कोटींची योजना तयार केली - फडणवीस
  'यांना घाटा काही माहीत नाही, वाटाच माहीत'
  '...तर पाण्याची लाईन पूर्ण झाली असती'
  'बाळासाहेब ठाकरेंचं या शहरावर प्रेम होतं'
  मुंबईशिवाय काही माहीत नाही - फडणवीस
  कोणीही अमरपट्टा घेऊन आला नाही - फडणवीस
  औरंगाबाद पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा - फडणवीस
  टक्केवारीसाठी भांडण सुरू आहे - फडणवीस
  'पाणीप्रश्न मिटेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

  19:34 (IST)

  'मविआ सरकारचं नाव 'जुम्मे के जुम्मे' सरकार'
  दानवेंचा पाण्यावरून मविआ सरकारवर निशाणा
  हे सरकार अमर-अकबर-अँथनी - रावसाहेब दानवे
  'या राज्यातील एकही प्रश्न हे सरकार सोडवत नाही'
  हे सरकार केंद्रावर खापर फोडतं - रावसाहेब दानवे
  सरकार बदललं, असंगत केली - रावसाहेब दानवे
  आमची मतं चोरीला गेली, चोर सापडला - दानवे
  यांना सजा सप्टेंबरमध्ये द्यायची - रावसाहेब दानवे
  दोन मंत्री जेलमध्ये आणि मुख्यमंत्री घरात - दानवे
  माझं कुटुंब, माझं जबाबदारी अशी हाक - दानवे
  'मुख्यमंत्री घरात आणि आम्ही दारात अशी अवस्था'
  सरकार जबाबदारीपासून पळ काढतंय - दानवे

  17:54 (IST)

  भाजपचा जल आक्रोश मोर्चा LIVE
  औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून आक्रमक
  देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा
  भाजपचा पैठण गेटपासून जल आक्रोश मोर्चा
  भागवत कराड, रावसाहेब दानवे सहभागी
  जल आक्रोश मोर्चासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
  कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी
  औरंगाबाद महापालिकेवर मोर्चा धडकणार
  पालिकेसमोर जनसभेमार्फत होणार समारोप
  'पाणीसमस्या मिटेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

  17:42 (IST)

  सातारा जिल्ह्यातील औंध इथं यमाईदेवी तळे सुशोभीकरणास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून काम होणार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स