Live Updates: जालना जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 442 नवे रुग्ण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 23, 2022, 16:02 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:6 (IST)
  नाना पटोलेंविरोधात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं पुन्हा आंदोलन, पटोलेंनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मनोरुग्णालयात भरती करण्याची गरज, त्यासाठी मी सोनिया गांधींना पत्र पाठवून विनंती करणार - चंद्रशेखर बावनकुळे
  20:53 (IST)

  बाळासाहेबांना देश विसरणार नाही - सुभाष देसाई
  बाळासाहेबांना विचारांचा वारसा घरातूनच - देसाई
  'शिवसैनिकांनी हा विचार जपला, पुढे चालू ठेवला'
  शिवसेनेत कधीही जात पाहिली नाही - सुभाष देसाई
  बाळासाहेबांनी तळागाळातल्यांना संधी दिली - देसाई
  बाळासाहेबांनी वारसा कधी सोडला नाही - सुभाष देसाई
  बाळासाहेब हिंदुत्वाचा अंगार होते - सुभाष देसाई
  'विचारांचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली'
  'मुख्यमंत्र्यांचा गौरव होणं अभिमानाची गोष्ट आहे'
  नवी वाट आपल्याला गवसली आहे - सुभाष देसाई
  विचारांचं तेज पुढचा मार्ग दाखवेल - सुभाष देसाई
  बाळासाहेबांनी देशाला राजकीय दिशा दिली - राऊत
  बाळासाहेबांनी सतत तरुणांना प्रेरणा दिली - राऊत
  'शिवसेनेला आस्थेनं विचारणारा वर्ग तरुणांचा'
  हेच तरुण शिवसेनेची ताकद आहे - संजय राऊत
  शिवरायांचं कार्य बाळासाहेबांनी पुढे नेलं - राऊत
  'शेतकऱ्यांची भीती वाटावी असं वातावरण कुणी केलं?'
  'देशासाठी काय केलं? प्रश्न कुणाच्या मनात येणार नाही'
  'मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकारची दमदार कामगिरी'
  'मुख्यमंत्र्यांचा गौरव होणं अभिमानाची गोष्ट आहे'
  विरोधकांचे वैफल्यातून सरकारवर आरोप - राऊत
  'सरकार बरखास्तीपलीकडे त्यांना काही दिसत नाही'
  खासदार संजय राऊतांचा विरोधकांना जोरदार टोला
  दिल्लीतलं वातावरण गढूळ झालंय - संजय राऊत
  देशाचा इतिहास रोज बदलला जातोय - राऊत
  हे राजकारण देशाला परवडणारं नाही - संजय राऊत
  बाळासाहेबांनी देशाला दिशा दिली - संजय राऊत

  उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना मार्गदर्शन
  बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन संवाद
  शिवसेनेला तेजस्वी वारसा - उद्धव ठाकरे
  राज्यात शिवसेनेची लाट आणा - उद्धव ठाकरे
  'दिल्लीतही बाळासाहेबांचा पुतळा उभारणार'
  'शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे'
  'दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण करणार'
  मुख्यमंत्र्यांचा काळजीवाहू विरोधकांवर हल्लाबोल
  विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार - मुख्यमंत्री
  'आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाणार नाही'
  '25 वर्षं युतीत सडली, हे माझं मत आजही कायम'
  एकट्यानं लढण्याची आमची तयारी - उद्धव ठाकरे
  भाजपलं सोडलं, हिंदुत्वाला नाही - उद्धव ठाकरे
  भाजप म्हणजे हिंदुत्व नाही - उद्धव ठाकरे
  'सोयीप्रमाणं बदलणारं आमचं हिंदुत्व नाही'
  ईडीची पिडा लावायची हे शौर्य नाही - मुख्यमंत्री
  'वापरायचं आणि फेकायचं, हा भाजपचा स्वभाव'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
  'आम्ही सूर्य उगवल्यावर शपथ घेतली, अंधारात नाही'
  हिंमत असेल तर राजकारणात भिडा - मुख्यमंत्री
  'महाराष्ट्राबाहेर देखील आता निवडणूक लढायची'
  हरलो तरी घाबरायचं नाही, लढायचं - उद्धव ठाकरे
  शिवसेनेत गद्दारांना क्षमा नाही - उद्धव ठाकरे
  'मूठभर शिवसैनिक असले तरी चालतील'
  'हातात बळ नसेल तर एकहाती सत्ता शक्य नाही'
  संधीचं सोनं करायला शिका - उद्धव ठाकरे
  ममता बॅनर्जींसारखी जिद्द दाखवा - उद्धव ठाकरे
  बाबरीनंतर देशात शिवसेनेची लाट होती - मुख्यमंत्री
  ...तर शिवसेनेचा आज पीएम झाला असता - मुख्यमंत्री
  निवडणूक कुठलीही असो, जिंकायचीच - मुख्यमंत्री

  19:37 (IST)

  मुंबईतील रेल्वे स्टेशन, शाळा/कॉलेज उडवून देण्याची
  ठाण्यात आला धमकीचा ई-मेल
  कुर्बानी, घमका सुरू होईल अशी दिली धमकी
  laskar29laskar22@pratonmail.com यावरून धमकी
  'शाळा-कॉलेज बंद करा, भारतीय शिक्षण संस्था चुकीची'
  'सर्वत्र फक्त मदरशातून शिक्षण दिलं पाहिजे'
  आमची हिंदूंची जिहादी संघटना, मेलमध्ये दावा
  ठाणे पोलिसांनी दाखल केला एफआयआर
  21 तारखेला आला होता ई-मेल
  ठाणे पोलीस स्कूल या शाळेला आला ई-मेल

  18:56 (IST)

  थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE
  उद्धव ठाकरे शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन
  बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन संवाद
  महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण
  मुंबईच्या माझगाव इथं अश्वारूढ पुतळ्याची उभारणी
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण
  पुतळ्याच्या माध्यमातून वारसा जपावा - मुख्यमंत्री
  'तलवार कशी गाजवायची हे नसानसात भिणलंय'
  'बाळासाहेबांचा मी पुत्र, योग्यवेळी तलवार चालवेनच'
  'आपल्याला महाराणा प्रताप होता येणार नाही'
  पण आपण चेतक होण्याचा प्रयत्न करावा - मुख्यमंत्री
  पुतळे बांधून थांबू नका तर तो विचार पुढे न्या - मुख्यमंत्री

  18:46 (IST)

  नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती
  बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण
  दिल्लीतल्या इंडिया गेटवर अनावरण सोहळा
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण
  आजचा दिवस ऐतिहासिक - नरेंद्र मोदी

  18:5 (IST)

  ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी वीज विभागाची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र, ज्यांनी आतापर्यंत थकबाकी भरली नाही, त्यांचं कनेक्शन तोडण्याच्या कारवाईची परवानगी मागितली, जेणेकरून अडचणीत असलेल्या वीज विभागाला वाचवता येईल

  16:56 (IST)

  पालिकेच्या रणधुमाळीला खूप वेळ - आदित्य ठाकरे
  कामं ही सातत्यानं सुरू असतात - आदित्य ठाकरे
  विरोधकांच्या आरोपांना काही अर्थ नाही - आदित्य
  आम्ही मैत्री निभावणारे लोक आहोत - आदित्य ठाकरे
  मैत्री करतो आणि निभावतोसुद्धा - आदित्य ठाकरे
  मंत्री आदित्य ठाकरेंचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

  16:27 (IST)

  मुंबई - वरळी मतदारसंघात मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते विविध विकासकामांचं उद‌्घाटन


   
  16:15 (IST)

  दिवंगत सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न एकनाथ शिंदेंनी केलं पूर्ण, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी सुमंत रुईकर यांच्या बीडमधील घराचं भूमिपूजन संपन्न, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची व्हीसीद्वारे उपस्थिती

  16:1 (IST)

  जालन्यात कोरोनाचा नवा उच्चांक, गेल्या 24 तासांत तब्बल 442 नवे कोरोना रुग्ण, सर्वाधिक 280 रुग्ण जालना शहरातील, सक्रिय रुग्णसंख्या 1803, पाच दिवसांत तब्बल 1597 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स