• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: नवाब मलिक यांना ED कडून अटक, मेडिकलसाठी जे जे हॉस्पिटलला रवाना

Live Updates: नवाब मलिक यांना ED कडून अटक, मेडिकलसाठी जे जे हॉस्पिटलला रवाना

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 23, 2022, 15:36 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:11 (IST)

  जशास तसं उत्तर देण्याची मविआची तयारी - सूत्र
  सरकार भाजप नेत्यांवर कारवाईच्या पवित्र्यात - सूत्र
  मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मंत्र्यांची मागणी - सूत्र
  'ते ईडी वापरतात, आपण सीआयडी वापरा'
  महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा आग्रह - सूत्र

  21:25 (IST)

  'कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा'
  'तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा'
  ईडी कोठडीनंतर नवाब मलिकांचं ट्विट

  21:24 (IST)

  'काही लोक छोटे साक्षीदार उभे करतायत'
  'लवकरच मी त्याचाही खुलासा करणार'
  विरोधी पक्षनेते फडणवीसांचं वक्तव्य

  21:22 (IST)

  या क्षणाची सर्वात मोठी बातमी
  मंत्री नवाब मलिकांना ईडी कोठडी
  मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी
  PMLA कोर्टाचा मलिकांना दणका
  घरचं जेवण आणि औषधाची परवानगी
  उद्या मविआचे नेते आंदोलन करणार

  'मनी लॉंड्रिंगची लिंक मिळाली होती'
  ईडीनं याबाबत चौकशी केली - फडणवीस
  सर्व सत्य आज ईडीनं मांडलं - फडणवीस
  ईडी कारवाई नियमानुसार - फडणवीस
  'आरोपीकडून जमीन का विकत घेतली?'
  'जमीन मालकांना पैसे मिळाले नाहीत'
  '55 लाख हसीना पारकरला दिले गेले'
  'पुढे हे पैसे दाऊदपर्यंत कसे गेले?'
  'सलीम पटेल हा हसीना पारकरचा हस्तक'
  'मुंबई स्फोट करणाऱ्यांकडून व्यवहार का?'
  'सर्व गोष्टी ईडीनं कोर्टासमोर ठेवल्या'
  संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर - फडणवीस
  'राजकीय पक्षांनी निषेध केला पाहिजे'
  टेरर फंडिंग करणाऱ्याशी संबंध - फडणवीस
  'राजीनामा न घेतल्यास चुकीचा संदेश जाईल'
  विरोधी पक्षनेते फडणवीसांचं वक्तव्य

  20:59 (IST)

  या क्षणाची सर्वात मोठी बातमी
  मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी
  मलिकांना कोर्टानं सुनावली ईडी कोठडी

  20:45 (IST)

  मुंबईतील चर्नी रोड येथील प्रस्तावित मराठी भाषा भवन इमारतीसाठी तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण

  20:22 (IST)

  आता यापुढे मविआ म्हणून लढणार
  मविआ सरकारची आता निर्णायक भूमिका
  एक-एक पक्ष ही लढाई नसेल - आघाडी
  यंत्रणा, केंद्राला मविआ म्हणूनच उत्तर देणार

  20:14 (IST)

  'नवाब मलिकांची अटक ही दुर्दैवाची गोष्ट'
  स. 6 वा. ईडी त्यांच्या घरी गेली - भुजबळ
  'मलिकांवर झालेली कारवाई चुकीची'
  'सातत्यानं टीका करत असल्यानं कारवाई'
  'मलिकांचं तोंड बंद करण्यासाठी हा प्रकार'
  '30 वर्षांत कुठेही मलिकांचं नाव आलं नाही'
  दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न - भुजबळ
  'वडाची साल पिंपळाला लावण्याचा हा प्रयत्न'
  सर्व आरोप मलिकांनी फेटाळलेत - भुजबळ
  मलिकांवरील कारवाईचा निषेध - भुजबळ
  'मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही'
  गुन्हा सिद्ध झालेला नाही - छगन भुजबळ
  उद्या स.10 वा. निषेध आंदोलन - भुजबळ
  'म. गांधींच्या पुतळ्याशेजारी आंदोलन करणार'
  परवापासून राज्यभरात आंदोलन - भुजबळ
  'तिन्ही पक्षांचे लोक आंदोलनात असणार'
  'तालुका,जिल्हा,शहर पातळीवर मोर्चे काढू'
  पब्लिक सब जानती है - छगन भुजबळ
  सरकार जाईल कसं यासाठी प्रयत्न - भुजबळ

  19:51 (IST)

  महाविकास आघाडीचे नेते मंत्री उद्या सकाळी 10 वाजता गांधी पुतळ्यासमोर करणार आंदोलन, तीनही पक्षांचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते मंत्रालयाच्या बाजूलाच असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निषेधासाठी जमणार, नवाब मलिकांच्या कारवाईविरोधात महाविकास आघाडीचा निषेधाचा पवित्रा

  19:44 (IST)

  चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात असलेल्या अंधारी, वैनगंगा नदीवरील पुलासाठी 110 कोटींचा निधी देण्याचं नितीन गडकरींचं आश्वासन, सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना
   यश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स