Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत चर्चा, राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याचे संकेत

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 23, 2021, 23:50 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  23:48 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य कोविड १९ प्रतिबंध टास्क फोर्स च्या बैठकीत येणार्या कोविड १९ संसर्ग संकटावर महत्वाची चर्चा झाली.

  कोविड १९ संसर्गाची संभाव्य तीसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारचे आरोग्य सुरक्षात्मक खबरदारीचे पाऊल उचलणार.

  ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतावर कोरोनाचं संकट

  टास्क फोर्समध्ये नव्या निर्बधांवर झाली चर्चा

  सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवे निर्बंध लागण्याची शक्यता

  उद्या दुपारी नवी नियमावली जाहिर होणार

  रात्री जमाव बंदी किंवा संचारबंदीचे १४४ कलम लागण्याची शक्यता

  लग्न समारंभ, ख्रिसमस, न्यू ईयर सेलेब्रेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोहळ्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यावर राज्य सरकारचा भर.

  23:42 (IST)

  राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत उद्या 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले. 

  आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी  लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या 

  22:43 (IST)

  - अधिवेशन सुरू असतांना एका व्यक्तीचा आत्मदहन प्रयत्न
  - पोलिसांच्या सतर्कतेनं प्रयत्न फसला
  - शाकिर अहमद शहा याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
  - शाकिर,कुर्ला येथील रहिवासी
  - पुनर्वसनास प्राप्त असूनही घर न मिळाल्याचा शाकिरचा आरोप
  - शाकिर,मरीन लाईन पोलिसांच्या ताब्यात

  22:31 (IST)
  जळगाव जिल्ह्यात 6 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू
   
  जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ६ जानेवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे.
   
  या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
  21:55 (IST)

  विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख 28 डिसेंबर ठरवण्यात आली आहे
  यासंदर्भात पत्र राज्यपालांना उद्या दिलं जाणार
  ही तारीख राज्यपालांना आधी सूचित करावी लागते
  27 डिसेंबरला उमेदवार अर्ज भरेल आणि 28 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाची खुल्या म्हणजेच आवाजी पद्धतीने निवडणूक घेण्यात येईल

  21:55 (IST)

  ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बैठकीत आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा आढावा; देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 336 वर 

  21:37 (IST)

  अंबरनाथ :

  अंबरनाथ शहरातील डम्पिंग ग्राऊंडला लागली आग

  मोरीवली पाड्याजवळील डम्पिंगला आग

  आगीमुळे डम्पिंग परिसरातून धुराचे मोठे लोट

  अजूनही अग्निशमन दल घटनास्थळी दाखल नाही

  21:6 (IST)

  सोलापूर - चेंबरमध्ये गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू
  ड्रेनेज लाईनचं काम करत असताना चौघं गुदमरले
  सोलापुरातल्या अक्कलकोट रोडवरील दुर्घटना
  4 मजुरांचा गुदमरून मृत्यू तर 2 जण जखमी
  पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांची माहिती 

  20:34 (IST)

  ठाणे : 

  परदेशातून ठाण्यात आलेला एक प्रवाशी ओमायक्रोन पॉझिटिव्ह, सध्या या रुग्णाला पालिकेच्या कोविड रुग्णालयात निगरानीखाली ठेवण्यात आला आहे, रुग्णाची प्रकृती स्थिर असून कुटूंबाची चाचणी करण्यात येणार आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

  20:29 (IST)

  मुख्यमंत्र्यांची रात्री 10 वा. टास्क फोर्ससोबत बैठक
  वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बैठक
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स