LIVE : वांद्र्यात 1 कोटींचे चरस जप्त, 2 जणांना अटक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 23, 2021, 17:46 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:31 (IST)

  सोमवारपासून 'लसीकरण आपल्या परिसरात'
  नागपूर महापालिकेची अभिनव मोहीम

  20:26 (IST)

  राज्यात दिवसभरात 29,177 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 26,672 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 594 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 92.12 तर मृत्युदर 1.59 टक्के
  राज्यात सध्या 3 लाख 48,395 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:38 (IST)

  वर्षा गायकवाड उद्या महाधिवक्त्यांना भेटणार?
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेण्याची शक्यता
  बारावी परीक्षेसंदर्भात भेट घेण्याची शक्यता
  राज्यातील परीक्षेबाबत भूमिका घेण्याच्या हालचाली

  18:48 (IST)

  मुंबईतील पी-305 बार्ज दुर्घटना प्रकरण
  आतापर्यंत 70 जणांचे मृतदेह हाती
  188 जण बचावले; अजूनही बचावकार्य सुरू

  18:46 (IST)

  पुण्यात दिवसभरात 709 नवीन रुग्ण
  पुण्यात दिवसभरात 2324 कोरोनामुक्त
  पुण्यात दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू

  18:36 (IST)

  मालाडला कोविड सेंटर नवीन बांधणार - आदित्य ठाकरे
  तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी - आदित्य ठाकरे
  'ग्लोबल टेंडर काढलं, नियमानुसार पुढे लसी मिळतील'
  'पर्यटनमंत्री मी असलो तरी पर्यटन मी करत नाही'
  फोटो काढण्यापेक्षा मी काम करत राहतो - आदित्य
  'विरोधक निराश झाले, त्यांनी टीका करत राहावं'
  'नागरिकांनी लसीकरण झालं तरी काळजी घ्यावी'
  मान्सूनपूर्व कामं सुरू; आदित्य ठाकरेंची माहिती

  18:4 (IST)

  पंढरपूर - उजनी पाणी बचाव संघर्ष समिती आक्रमक, उद्यापासून जिल्हाभर तीव्र आंदोलन, सोलापूरच्या जनतेची केली फसवणूक, अजित पवार व जयंत पाटलांवर केला आरोप, पाणी रद्दचा आदेश न देता नेमली मर्जीतील अधिकाऱ्यांची समिती, जयंत पाटलांनी घोषणा करून 5 दिवस झाले तरी आदेश अद्याप नाही झाला रद्द

  17:32 (IST)

  सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
  CBSE आपल्या बोर्ड परीक्षा आयोजित करणार
  तारखा आणि स्वरूप 1 जूनपासून जाहीर होणार
  दिल्लीतल्या महत्वपूर्ण बैठकीत मोठा निर्णय
  राज्याच्या बोर्ड परीक्षांचा निर्णय राज्यच घेणार

  16:34 (IST)

  वांद्रे परिसरात 1 कोटी 19 लाखांचं ड्रग्ज जप्त
  मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई
  दोन आरोपींना अटक, महिलेचाही समावेश

  16:8 (IST)

  '5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच'
  विनायक मेटे मराठा मोर्चावर ठाम
  'मराठा क्रांती संघर्ष मोर्चा - लढा आरक्षणाचा'
  'जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा'
  सर्व नियम पाळून निघणार मोर्चा - विनायक मेटे
  मराठा आरक्षण मिळेपर्यंत लढा देणार - मेटे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स