• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात 'वर्षा'वर बैठक

LIVE: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात 'वर्षा'वर बैठक

कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्याचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 23, 2021, 14:17 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:0 (IST)

  भाजप नेते उद्या सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची घेणार भेट, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आणखी काही नेते राज्यपालांची भेट घेणार, भाजप नेत्यांची ही सदिच्छा आणि पूर्वनियोजित भेट असल्याचं सांगण्यात येतंय, राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची

  21:30 (IST)

  भारत विरुद्ध इंग्लंड पहिली वन-डे
  भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
  इंग्लंडचा 66 धावांनी उडवला धुव्वा
  भारताची वन-डे मालिकेत 1-0 अशी आघाडी

  21:1 (IST)

  मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांमधील 'वर्षा'वरील बैठक संपली
  उद्धव ठाकरे-अनिल देशमुखांमध्ये 1 तास चर्चा
  लेटरबॉम्बनंतर मुख्यमंत्री-गृहमंत्री पहिल्यांदाच भेट

  20:27 (IST)

  राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट
  राज्यात दिवसभरात 28,699 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 132 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 13,165 कोरोनामुक्त
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 88.73 टक्के
  राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 30,641
  गेल्या 6 महिन्यांत सर्वाधिक मृत्यूची संख्या
  सापडलेले रुग्ण, बरे झालेल्या रुग्णांमध्ये तफावत
  मृतांच्या संख्येनं राज्य सरकारची चिंता वाढवली

  20:18 (IST)

  API रियाझ काझी आजही चौकशीला होते हजर
  रियाझ काझी NIA कार्यालयातून पडले बाहेर
  रियाझ काझी NIAच्या तपासातला महत्वाचा दुवा

  20:6 (IST)

  गृहमंत्री अनिल देशमुख 'वर्षा' बंगल्यावर
  अनिल देशमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला
  'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची चर्चा
  रश्मी शुक्लांच्या पत्राबाबत चर्चेची शक्यता

  19:52 (IST)

  पुणे शहरात दिवसभरात 3098 नवे रुग्ण
  पुणे शहरात दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू

  19:37 (IST)

  कोल्हापूर - गोकुळ दूध संघ निवडणुकीचं बिगुल वाजलं
  2 मे रोजी मतदान, 4 मे रोजी होणार मतमोजणी
  25 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात
  कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार

  19:13 (IST)

  मुंबई - कॉंग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक संपली
  थोरातांच्या निवासस्थानी पार पडली बैठक
  सध्याच्या परिस्थितीबाबत बैठकीत चर्चा
  यापूर्वी भूमिका मांडली -बाळासाहेब थोरात
  याव्यतिरिक्त काहीही बोलण्यास दिला नकार
  'आजच्या बैठकीतला अहवाल हायकमांडला देणार'

  19:10 (IST)

  छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील घटना, माओवाद्यांनी जवानांनी भरलेली बस भूसुरुंग स्फोट करून उडवली, कडेनार ते मंदोडादरम्यानचा धक्कादायक प्रकार, भूसुरुंग स्फोटात 5 जवान शहीद, 12 जवान जखमी

  कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्याचे लेटेस्ट अपडेट्स