LIVE NOW

LIVE : पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | February 23, 2021, 10:07 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 23, 2021
auto-refresh

Highlights

10:07 pm (IST)

वाशिम - पोहरादेवीत गर्दी झाल्याचं प्रकरण
10 हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल
कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका

9:00 pm (IST)

अवकाळी आणि गारपिटीचा शेतीला फटका
'नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करावा'
मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे निर्देश

8:45 pm (IST)

मुंबईतल्या गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास संदर्भात थॉमस समिती रिपोर्ट गृहनिर्माण विभागाकडे सादर, लवकरच मार्ग काढण्याची शक्यता -सूत्र

8:34 pm (IST)

मुंबई/पनवेल आणि मडगावदरम्यान शनिवार आणि रविवारी विशेष गाड्या

8:30 pm (IST)

मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्टमध्ये करण्याबाबत नियोजन करा, वर्क फ्रॉम होमची परिणामकारक यंत्रणा निर्माण करा, 
मंत्रालयीन सर्व कर्मचाऱ्यांचं प्राधान्यानं लसीकरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला निर्देश

7:39 pm (IST)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर पार पडली बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही होते उपस्थित
सर्व मनपा आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
मुख्य सचिव संजय कुमारही होते उपस्थित
कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी चर्चा
बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या सूचना
पुन्हा नव्यानं नियमांचा प्रचार करा -मुख्यमंत्री
'लोकांपर्यंत पुन्हा नव्यानं माहिती पोहोचवा'
नुकसान काय आहे ते पटवून द्या -उद्धव ठाकरे

7:29 pm (IST)

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची चिंता आहे -संजय राठोड
'पोहरादेवीत गर्दी झाली, मात्र लोक स्वत:हून आले'
'नियम पाळावेत अशा सूचना केल्या होत्या'
वनमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया

7:07 pm (IST)

मराठा, मुस्लिमांना आरक्षण दिलं जावं, मुस्लिम आरक्षण हा कॉमन मिनिममचा भाग, मंत्रिमंडळात आमची भूमिका मांडू -नाना पटोले

7:04 pm (IST)

राज्यात दिवसभरात 6,218 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 5,869 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.96 टक्के
राज्यात सध्या 53,409 ॲक्टिव्ह रुग्ण

 

7:00 pm (IST)

विनामास्क फिरणाऱ्यांना मुंबई पालिकेचा दणका
2 दिवसांत 32 कोटी 70 लाखांचा दंड वसूल
मुंबईत मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई
पोलिसांनी 16 लाख 17 हजारांचा केला दंड वसूल
रेल्वेनं 91 हजार 800 रुपये दंड केला वसूल

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स