liveLIVE NOW

LIVE Updates : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,141 वर, 145 जणांचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 22, 2021, 23:55 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:33 (IST)

  काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
  सुनील केदारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा - देशमुख
  काँग्रेस नेते आशिष देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  21:31 (IST)

  राज्यात दिवसभरात 4,141 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 4,780 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 145 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत दिवसभरात 294 रुग्ण, एकाचा मृत्यू

  21:2 (IST)

  सरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा उद्याचा पुणे दौरा रद्द
  सुधारित दौरा नंतर जाहीर होणार - डिफेन्स पीआरओ

  20:26 (IST)

  महाडमधील ऐतिहासिक चवदार तळे
  चवदार तळे स्वच्छ, सुशोभित करणार - शिंदे
  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
  महाडमधील पूरस्थितीबाबत दीर्घकालीन उपाययोजना
  त्यासाठी अभ्यासगट स्थापन करणार - एकनाथ शिंदे

  20:0 (IST)

  मुंबईसह मुंबईसह उपनगरातही प्रवाशांची लूट
  सण आणि वाहतूक कोंडीचं कारण देत लूट
  खासगी टॅक्सी कंपन्यांकडून प्रवाशांची लूट
  कंपन्यांकडून तिप्पट, चौपट दर आकारणी
  बुकिंग करूनही चालकांची मनमानी सुरूच
  मनमानीपणा करत चालकांनी नाकारली भाडी

  17:2 (IST)

  सांगली - निसर्ग आणि पर्यावरणावर विचारमंथन
  पूर परिषदेत जलसंपदामंत्री जयंत पाटलांचं वक्तव्य
  मानवानं निसर्गाशी खेळ केला - जयंत पाटील
  'महापूर आणि वन्यप्राणी येणं याचाच हा परिणाम'
  'मानवाकडून निसर्गाचं शोषण आणि प्रदूषण'
  पूर परिषदेत मंत्री विश्वजीत कदमांचं वक्तव्य

  15:8 (IST)

  नारायण राणेंचा अनुभव दांडगा - चंद्रकांत पाटील 
  'शिवसेनेबाबत ते जे बोलतात त्यात तथ्य असेल'
  शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज - चंद्रकांत पाटील
  मंत्रिपद मिळाले पण रिमोट अन्य ठिकाणी - पाटील
  '3 पक्षांचं सरकार किती काळ चालेल माहीत नाही'
  या सरकारमुळे दुखावलेल्यांना न्याय देऊ - पाटील
  आगामी निवडणुका स्वबळावरच लढवू - पाटील
  'मागास आयोगाचं काम सरकार सुरू का करत नाही?'
  'आंदोलन करू नका असं सरकार कसं म्हणू शकतं?'
  चंद्रकांत पाटील यांचा अशोक चव्हाण यांना सवाल
  'यशोमती ठाकूर यांच्या प्रमाणेच अन्य मंत्र्यांचीही स्थिती'
  सगळ्याच मंत्र्यांची गळचेपी होतेय - चंद्रकांत पाटील

  12:52 (IST)

  नागपूर - वारांगनांची वस्ती हटवण्यावरून वाद
  वारांगना वस्ती स्थलांतराची स्थानिकांची मागणी
  गंगा-जमुना बचाव समितीचा स्थलांतराला विरोध

  12:37 (IST)

  'जनआशीर्वाद यात्रेनं मुंबईकरांची छळवणूक'
  यात्रेत अनेकांनी मास्क लावले नव्हते - महापौर
  रुग्ण वाढले तर जबाबदार कोण? - महापौर
  'कोविडकाळात एकनाथ शिंदेंचं मोठं काम'
  'शिंदेंबाबतचं वक्तव्य हे राणेंना पडलेलं स्वप्न'
  'लसीकरणाचा विक्रम होतोय यासाठी केंद्राचे आभार'
  काही जणांकडून खोडा घालण्याचं काम - महापौर

  10:2 (IST)

  भिवंडी - पारनाक्यावरील 4 दुकानांना आग
  दुकानांतील कपडे आगीत जळून खाक
  अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
  शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची माहिती

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स