Live Updates : पुण्यात ढोल ताशांसह बँड पथकांना वाद्य वाजवण्यास परवानगी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 22, 2021, 21:20 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:54 (IST)

  रिलायन्स इंडस्ट्रीजचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर
  कंपनीला 13,680 कोटींचा नफा, जिओची भरारी कायम

  21:22 (IST)

  पुणे - ढोलताशांचा दणदणाट पुन्हा ऐकायला मिळणार
  बँड पथकांनाही वाद्य वाजवण्याची दिली परवानगी
  वाद्य वाजवणाऱ्यांनी 2 डोस घेतले असले पाहिजेत
  पुणे मनपा आयुक्तांनी ढोल पथकांवरील बंदी उठवली

  20:27 (IST)

  महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण ही सर्व 

  माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध, पारदर्शकता ठेवण्यासाठी आयोगाचं महत्वाचं पाऊल

  20:4 (IST)

  करी रोडच्या वन अविघ्न टॉवरमधील आग प्रकरण
  'आगप्रकरणी FIR दाखल, चौकशी समिती नेमली'
  'अतिरिक्त आयुक्त संजीवकुमारांच्या अंतर्गत समिती'
  मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल यांची माहिती
  महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली आढावा बैठक
  जुलैमध्ये फायर ऑडिट करण्यात आलं - महापौर
  'स्पिकलर फायर सेफ्टीमुळे आग कमी पसरली'
  मृत्यू झालेला व्यक्ती मदतीसाठी गेला होता - महापौर
  बैठकीत स्पिकलरची उपाययोजना करण्याबाबत सूचना
  '8 दिवसांत चौकशी समिती आढावा सादर करणार'
  विकासकावर एफआयआर दाखल - किशोरी पेडणेकर

  19:48 (IST)

  अमित शाह - देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू
  अमित शाहांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

  19:23 (IST)

  शाहरुख खानचा बॉडीगार्ड आला होता कार्यालयात
  एनसीबीनं 'मन्नत'वर जाऊन दिली होती नोटीस
  आर्यन संबंधित कागदपत्रं एनसीबीला हवी होती
  शाहरूखच्या बॉडीगार्डनं कागदपत्रं एनसीबीला दिली

  19:8 (IST)

  परमबीर सिंगांना निलंबित करण्यात यावं असा प्रस्ताव डीजीपी संजय पांडेंनी दिला होता, त्यावर सरकारनं अजून काही निर्णय घेतला नसल्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  19:8 (IST)
  गडचिरोली, नागपूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला, सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, गुन्ह्याची घटना कमी करायची असेल, महिला अत्याचार कमी करायचा असेल, अंमली पदार्थाच्या घटना कमी करायच्या असतील तर शेवटच्या बीट अमलदारापर्यंत जबाबदारी देऊन गुन्हे नियंत्रित करणं हाच त्यावरचा उपाय - दिलीप वळसे पाटील
  18:59 (IST)

  पुणेकरांसाठी दिलासादायक, सकारात्मक बातमी
  सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही बळी नाही

  18:56 (IST)

  पुणे शहरात 94 टक्के लसीकरण पूर्ण, 18 ते 44 वयोगटातील 103% जणांचा पहिला डोस तर 60 वर्षांवरील 80% नागरिकांचा पहिला डोस पूर्ण, अपेक्षित लाभार्थ्यांपेक्षा पुणे शहरात जास्त लसीकरण, पुणे मनपा व आरोग्य विभाग लस न घेतलेल्यांचा घेणार शोध, महापालिका मतदारयाद्यांच्या आधारे घेणार वंचितांचा शोध

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स