Live Updates: पुणे विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमानांची उड्डाण उशिराने!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | November 23, 2021, 00:27 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:18 (IST)

    अमरावती - संचारबंदीमध्ये आणखी शिथिलता
    सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत संचारबंदीमध्ये सूट
    जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

    20:0 (IST)

    पुणे - कोंढवा परिसरातील येवलेवाडी इथं हाणामारी; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

    19:44 (IST)

    औरंगाबाद - जिल्हाधिकारी सुनील चव्हाणांचं एक पाऊल मागे, सील केलेला पेट्रोल पंप केला खुला, पेट्रोल पंप संघटनेनं दिला होता कोर्टात जाण्याचा इशारा

    19:1 (IST)

    नाना पटोलेंनी राजभवनवर घेतली राज्यपालांची भेट
    राज्यपालांच्या भेटीनंतर पटोले 'सिल्व्हर ओक'कडे
    शरद पवारांसोबत महत्वाची बैठक होण्याची शक्यता

    18:53 (IST)

    नाशिक - बोगस बायोडिझेल पंपावर पोलिसांचा छापा
    अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाची कारवाई
    छाप्यात तब्बल 40 हजार लीटर बोगस बायोडिझेल जप्त
    नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीतील घटना

    18:51 (IST)

    कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला धक्का
    भाजपच्या 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
    महेश पाटील,सुनीता पाटील,सायली विचारे शिवसेनेत
    मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

    17:55 (IST)

    'सरकारसोबत चर्चा करण्यास तयार आहोत'
    'केवळ सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा व्हावी'
    सरकार, परिवहन मंत्र्यांनी वेळ ठरवावी - संपकरी
    प्रत्येक डेपोतून 2 कर्मचाऱ्यांना घ्यावं - संपकरी
    विलीनीकरणाच्या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम
    'मागणी मान्य होईपर्यंत आमचं आंदोलन सुरूच'
    सरकारी समितीवर आमचा विश्वास नाही - संपकरी
    'सरकारनं तारीख द्यावी, आम्ही चर्चेला तयार'

    17:47 (IST)

    विधान परिषदेसाठी कॉंग्रेसकडून उमेदवार जाहीर
    कोल्हापुरातून सतेज पाटील यांना तिकीट
    धुळ्यातून गौरव वाणी यांना उमेदवारी

    17:38 (IST)

    ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिकांविरोधात खटला
    ज्ञानदेव वानखेडेंना हायकोर्टाकडून दिलासा नाही
    'मलिकांनी माहितीची खातरजमा करूनच ट्विट करावं'
    नवाब मलिकांना मुंबई हायकोर्टाचे निर्देश

    17:33 (IST)

    अमित शाहांचा रद्द झालेला दौरा 26 तारखेला होणार
    आयबी आणि पोलिसांच्या हालचालींमध्ये वाढ
    उद्यापासून दौरा मार्गावर सुरक्षेबाबत प्रात्यक्षिक करणार

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स