• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: कोरोना संकट, देशात अद्यापही प्रचारसभा काढण्यावर बंदीच, निवडणूक आयोगाचा निर्णय

Live Updates: कोरोना संकट, देशात अद्यापही प्रचारसभा काढण्यावर बंदीच, निवडणूक आयोगाचा निर्णय

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 22, 2022, 15:47 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:1 (IST)

  रेल्वे प्रवाशांसाठी या घडीची सर्वात मोठी बातमी
  मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा दरम्यान 14 तास मेगाब्लॉक
  आज रात्री 1 पासून उद्या दुपारी 3 पर्यंत मेगाब्लॉक
  5व्या आणि 6व्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मेगाब्लॉक
  ठाणे-दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर मेगाब्लॉक
  अप-डाऊन दिशेला लोकल केवळ धीम्या मार्गावरून

  20:49 (IST)

  गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
  भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकरांचा राजीनामा
  गोवा विधानसभेसाठी तिकीट नाकारल्यानं राजीनामा
  अपक्ष लढण्याची लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घोषणा 

  20:30 (IST)

  कोरोना रुग्णसंख्येत घट; मुंबईकरांना दिलासा 
  मुंबईत दिवसभरात 3,568 कोरोना रुग्णांची नोंद
  तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच रुग्णसंख्या कमी
  मुंबईत 231 रुग्ण बरे, 10 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू 
  मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर 96%  

  20:22 (IST)

  मुंबई - गोवंडीतल्या शिवाजीनगरमध्ये 20 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार; शिवाजीनगर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 2 आरोपींना केली अटक तर 2 आरोपींचा शोध सुरू 

  19:2 (IST)

  दापोली :

  दापोली वणौशी तिघेरी हत्याकांड उघडीस

  रत्नागिरी  व दापोली पोलिसांची दमदार कामगिरी

  केवळ आठ दिवसात पोलिसांनी लावला शोध

   तीन वयोवृद्ध महिलांचा खुन करणारा पोलिसांच्या ताब्यात

  संशयित रामचंद्र शिंदे (वय ५३)  पोलिसांच्या ताब्यात

  17:37 (IST)

  भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढेंचा आरोप
  'हायकमांडनं झापल्यावर पटोलेंकडून तथाकथित मोदी'
  'दिशाभूल करण्यासाठी नानांकडून केविलवाणा प्रकार'
  पोलीस नाना पटोलेंना पाठीशी घालत आहेत - मेंढे 

  17:28 (IST)

  आमदार प्रताप सरनाईकांवरील दंड माफीचा मुद्दा
  भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट
  मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात भाजप आक्रमक
  चौकशी करून कारवाईची राज्यपालांकडे मागणी
  दंड माफ करणं घटनेविरोधात - चंद्रकांत पाटील

  17:21 (IST)

  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा वादात?
  'युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्याकडून फसवणूक'
  एका पीडित महिलेनं केली फसवणुकीची तक्रार
  फोनवर बोलताना नवनीत राणांनी दिलेलं उत्तर व्हायरल
  कार्यकर्ता, महिलेला दिलेल्या उत्तराची क्लिप व्हायरल
  पीडितेनं महिला आयोगाकडे देखील केली तक्रार
  राज्य महिला आयोगानं दिले कारवाईचे निर्देश

  17:18 (IST)

  वाशिम :

  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

  आज एकाच दिवशी आढळले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमधील सर्वाधिक 192 नवे रुग्ण

  तर 69 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 42892

  सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण - 789

  डिस्चार्ज - 41463

  मृत्यू - 639

  17:10 (IST)

  नागपूरमध्ये महिलेवर अॅसिड हल्ला
  रामेश्वर भागाताली घटना
  हल्लेखोर दुचाकीवरुन आले होते
  हल्ल्यात महिला 60 टक्के जखमी
  महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स