LIVE : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच, आजही रुग्णसंख्येत मोठी वाढ

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 22, 2021, 21:17 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:28 (IST)

  राज्यात दिवसभरात 24,645 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 58 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 19,463 कोरोनामुक्त
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.22 टक्के
  राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 15,241

  20:4 (IST)

  पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीवर भर द्यावा, यंदाच्या पावसाळ्यात 4 कोटी वृक्ष लावण्याचं नियोजन, भौगोलिक प्रदेश व हवामानानुसार वृक्षलागवड करावी -उद्धव ठाकरे

  20:3 (IST)

  मुंबईत दिवसभरात 3260 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू
  316 इमारती सील तर 40 कंटेन्मेंट झोन

  19:19 (IST)

  दादर स्टेशनवर मास्क न घातलेल्यांची चाचणी
  68 लोकांची अँटिजेन टेस्टिंग; 6 जण बाधित
  बाधित 6 जणांना विलगीकरण कक्षात केलं दाखल

  19:13 (IST)

  प्रवीण दरेकरांनी घेतली राज्यपालांची भेट
  पोलिसांची प्रतिमा धुळीला मिळाली -दरेकर
  आरोपांची सखोल चौकशी व्हावी -प्रवीण दरेकर
  'राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा'
  राज्य सरकारविरोधात जनतेत असंतोष -दरेकर
  राज्यात अराजकसदृश स्थिती -प्रवीण दरेकर

  18:32 (IST)

  मनसुख हिरण हत्येप्रकरणी एटीएसनं आणखी एकाला गुजरातमधून घेतलं ताब्यात, आरोपीकडून 14 सिमकार्ड केली जप्त

  18:26 (IST)

  माध्यमांनी फार उत्सुकता ताणू नये -राजेश टोपे
  'पवारसाहेब जो निर्णय घेतील तो योग्यच असेल'

  18:18 (IST)

  वि.प. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर राजभवनवर
  दरेकर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला

  18:14 (IST)

  मेट्रोसिटीमध्ये रुग्ण वाढतायत -राजेश टोपे
  'मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर गरजेचा'
  कोरोना प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्बंध'
  पुण्यातले जम्बो सेंटर्स पुन्हा सुरू करतोय -टोपे
  राज्यात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ -टोपे
  गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न -टोपे
  '2400 प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण'
  'रोज सरासरी 3 लाख नागरिकांचं लसीकरण'
  'राज्यात लसीकरण कार्यक्रम आक्रमतेनं राबवू'
  '3 महिन्यांत लसीकरण मोहीम संपवण्याचं उद्दिष्ट'
  'खासगीमध्ये 600 ठिकाणी लसीकरणाची मान्यता'
  'पुण्यात टेस्टिंग सर्वाधिक, मोदींनीही मान्य केलंय'
  73% चाचण्या RTPCR टेस्ट करतोय -राजेश टोपे
  प.बंगालमध्ये कुठलेच नियम पाळले जात नाही -टोपे
  'गुजरातमध्ये क्रिकेटच्या मॅचेस सुरू, तिथंही गर्दी'
  'त्या मानानं आपल्या राज्याची उत्तम अंमलबजावणी'
  'कोरोना रुग्णांची लपवाछपवी आम्ही करत नाही'
  'केंद्रानं मुभा दिली तर 45 वर्षांखालील लोकांनाही लस'
  वाढती रुग्णसंख्या धोक्याची -राजेश टोपे
  राज्यात लॉकडाऊनची वेळ येऊ शकते -टोपे
  निर्बंध पाळा, अन्यथा लॉकडाऊन -टोपे
  आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा पुण्यात इशारा

  18:0 (IST)
  परमबीर सिंगांच्या याचिकेवर 26 मार्चला सुनावणी
   

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स