LIVE NOW

LIVE : आज राज्यात 9043 रुग्णांची कोरोनावर मात, 8470 नवीन रुग्णांचे निदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | June 22, 2021, 10:22 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated June 22, 2021
auto-refresh

Highlights

9:55 pm (IST)

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या महत्वाकांक्षी योजनेला स्थगिती, टाटा कॅन्सर हॉस्पिटलला दिले होते 100 फ्लॅट्स, कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची केली होती सोय, पण काही सेना आमदारांच्या विरोधामुळे तात्पुरती स्थगिती, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा वाद

8:42 pm (IST)

राज्यात दिवसभरात 9,043 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 8,470 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 188 रुग्णांचा मृत्यू
रिकव्हरी रेट 95.09 तर मृत्युदर 1.98 टक्के
राज्यात सध्या 1 लाख 23,340 अॅक्टिव्ह रुग्ण

8:35 pm (IST)

महाराष्ट्रात आज लसीकरणाचा उच्चांक
एकाच दिवशी 5 लाख 52 हजार लोकांना लस

8:32 pm (IST)

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या दगडखाणी पुन्हा सुरू, राज्य सरकारची 102 दगडखाणींना पुन्हा सुरू करण्यास परवानगी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती, गेल्या 5 वर्षांपासून या दगडखाणी होत्या बंद, 35 ते 40 हजार लोकांच्या उपजीविकेचा मार्ग मोकळा, या दगडखाणी सुरू झाल्यानं मुंबईच्या विकासाला गती मिळणार

7:38 pm (IST)

शिर्डी साई संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे
पंढरपूरचं विठ्ठल देवस्थान काँग्रेसच्या पारड्यात
कॉंग्रेस, राष्ट्रवादी या दोघांनी केला होता दावा
महामंडळांच्या नियुक्त्या 15 दिवसांत जाहीर होणार
तीनही पक्षांना समसमान वाटप, अपक्षांनाही हिस्सा

7:19 pm (IST)

महामंडळ वाटपासंदर्भात बैठक झाली - नाना पटोले
महाविकास आघाडीत समन्वय, वाद नाही - पटोले
'स्वबळाचा नारा ही मोठी आश्चर्याची गोष्ट नाही'
प्रत्येकाला पक्ष मोठा करायचाय - नाना पटोले
अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा उमेदवार राहील - पटोले
काही महामंडळांचं वाटप झालंय - एकनाथ शिंदे
अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील - एकनाथ शिंदे
तिन्ही पक्षांकडे महामंडळं असतील - एकनाथ शिंदे
'आमदार संख्येनुसार महामंडळं ठरवली जातील'
आघाडीत विसंवाद नाही, गैरसमज नाहीत - शिंदे
भाजपसोबत जाण्याच्या चर्चेत दम नाही - एकनाथ शिंदे

7:14 pm (IST)

नागपूर - अनैतिक संबंधातून एकाची नाग नदीच्या पाण्यात हत्या, योगेश घोंगळेची धारधार शस्त्रानं केली हत्या, आरोपी सुशील धोटे आणि मित्रानं केलं कृत्य, नागपूरच्या जगनाडे चौक परिसरातील धक्कादायक घटना

6:59 pm (IST)

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहावी - मुख्यमंत्री

6:43 pm (IST)

दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची झाली बैठक
राष्ट्रीय मंचतर्फे आयोजित केली होती बैठक
पवारांच्या निवासस्थानी झाली महत्वाची बैठक
देशातील विरोधी पक्षांचे नेते दिल्लीत एकवटले
जवळपास अडीच तास बैठकीत खलबतं
ही बैठक पवारांनी बोलवली नाही - माजिद मेमन
'ही बैठक यशवंत सिन्हांनी बोलवली आहे'
'काँग्रेसच्या प्रतिनिधींना आम्ही बोलवलं होतं'
काँग्रेसचा बायकॉट असं काही नाही - माजिद मेमन
'राजकीय, सामाजिक विषयांवर बैठकीत चर्चा'
'राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही'

 

6:18 pm (IST)

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स