• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : अण्णा हजारे 30 जानेवारीला राळेगणसिद्धीत करणार आंदोलन

LIVE : अण्णा हजारे 30 जानेवारीला राळेगणसिद्धीत करणार आंदोलन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 22, 2021, 18:19 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:11 (IST)

  शरद पवार उद्या 'सिरम'ला भेट देणार
  आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भेट

  21:56 (IST)

  भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरण
  फरार मुख्य संशयित आरोपी सुनील झंवरच्या मुलाला अटक
  पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज झंवर गजाआड
  बीएचआरच्या जमिनी कवडीमोल किमतीत विकत घेतल्याचा आरोप

  21:21 (IST)

  राज्यात आज 21,610 कर्मचाऱ्यांना लसीकरण
  आतापर्यंत एकूण 74 हजार कर्मचाऱ्यांना लस
  बीड,हिंगोली,अमरावती,वर्धा,जालना,उस्मानाबाद
  या 6 जिल्ह्यांमध्ये 100% पेक्षा अधिक लसीकरण

  20:23 (IST)

  ठाणे-मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाच्या गर्डर उभारण्यासाठी ठाणे-मुलुंडदरम्यान 23-24 जानेवारी आणि 24-25 जानेवारीच्या मध्यरात्री मेगाब्लॉक; अप-डाऊन धीम्या, जलद मार्गासह पाचवा-सहावा मार्ग अशा 6 मार्गांवर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 या वेळेत हा ब्लॉक, मेगाब्लॉक काळात कुर्ला ते ठाणेदरम्यान मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 पर्यंत लोकल फेऱ्या रद्द राहणार; कोपरी पुलावरून जाणाऱ्या वाहतुकीचंही नियमन, 23 तारखेला रात्री 9 ते सकाळी 6 आणि 24 तारखेला रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत वाहतूक इतरत्र वळवली

  20:3 (IST)

  आपल्या देशात तयार झालेली लस जगात सर्वोत्कृष्ट, मोदी आणि सर्व मंत्रिमंडळ लस घेणार -रामदास आठवले
  शेतकरी आंदोलनाचं राजकारण केलं जातंय, केंद्र सरकार कायदे 2 वर्षांसाठी स्थगित करायला तयार -आठवले

  19:39 (IST)

  पोल्ट्री व्यावसायिकांना बर्ड फ्लूचा फटका, राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई अदा करणार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

  19:6 (IST)

  दाऊदच्या आणखी एका हस्तकाला अटक
  सलमान पठाणच्या मुसक्या आवळल्या
  सलमान चिंकू पठाणचं नेटवर्क सांभाळायचा
  सलमान पठाणचीही स्वत:ची वेगळी गॅंग
  डोंगरीमध्ये सलमान पठाणची दहशत होती
  कारवाईदरम्यान सलमानचा भाऊ फरहान फरार

  18:14 (IST)

  नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा 30 जानेवारीला राळेगणसिद्धीत शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा, अण्णांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि ते दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांनी अण्णा हजारेंशी केली चर्चा

  17:51 (IST)

  साताऱ्यातील आणेवाडी टोलनाका प्रकरण
  उदयनराजेंसह 11 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

  17:50 (IST)

  देशातल्या 12 राज्यांत बर्ड फ्लूचा धोका वाढला
  महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत शिरकाव
  राजस्थान, जम्मूमध्येही बर्ड फ्लूचा शिरकाव

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स