• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: उद्यापासून नाट्यगृह आणि थिएटर्स होणार खुली

Live Updates: उद्यापासून नाट्यगृह आणि थिएटर्स होणार खुली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 21, 2021, 22:17 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:8 (IST)

  वारसास्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणं गरजेचं, राज्यासह देशाला निश्चितच लाभ होईल - आदित्य ठाकरे

  21:34 (IST)

  नवाब मलिकांनी काही वानखेडेंविरोधात पुरावे दिले नाहीत, आम्ही एनसीबीची चौकशी करण्याचा काही प्रश्नच नाही, मी त्यांच्याशी बोलेन - दिलीप वळसे पाटील

  21:34 (IST)

  शिरूर आणि औरंगाबाद घटनेचा तपास सुरू आहे, आरोपींना लवकरात लवकर पकडलं जाईल - गृहमंत्री

  21:25 (IST)

  मुंबई - ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 6 ठिकाणी छापेमारी, एनसीबीच्या कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे हाती

  20:6 (IST)

  जळगाव - जामनेर तालुक्यातील लोणी इथं अतिक्रमण निर्मूलन कारवाईवेळी पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक कर्मचाऱ्याला ग्रामस्थांची मारहाण, मारहाण करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक, याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  20:5 (IST)
  राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात समितीचा अहवाल शासनाकडे सादर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
   
  19:59 (IST)

  नवाब मलिकांची बेताल वक्तव्यं सुरू - प्रवीण दरेकर
  'स्वत: तुरुंगात जाणार नाही ना याची काळजी घ्यावी'
  नवाब मलिक पातळी सोडून बोलू लागलेत - दरेकर
  नवाब मलिक विनाकारण बोलतायत - प्रवीण दरेकर

  19:51 (IST)

  'वानखेडे एनसीबीत आल्यापासून दुबईला गेले नव्हते'
  नवाब मलिकांच्या आरोपांवर एनसीबीचं स्पष्टीकरण
  'कुटुंबासोबत मालदीवला जाण्यासाठी सुट्टी घेतली होती'
  वानखेडेंनी अधिकृतरीत्या परवानगी घेतली होती - NCB

  19:49 (IST)

  रत्नागिरी - कोकणात पुन्हा एकदा तस्करी उघड, 6 कोटी बाजारभाव असलेली व्हेल माशाची उलटी बाळगणाऱ्या चौघांना वन विभाग आणि पोलिसांनी सापळा रचून केलं जेरबंद

  19:47 (IST)

  नवाब मलिकांची समीर वानखेडेंवर आरोपांची ट्विट मालिका सुरूच, समीर वानखेडे खोटं बोलतायत, वानखेडे बहिणीबरोबर दुबईला असल्याचा आरोप

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स