Live Updates: अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजपचे उद्या राज्यभर आंदोलन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 21, 2021, 19:37 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:48 (IST)

  औरंगाबाद - लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सील; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पहिली कारवाई

  21:16 (IST)

  संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं मोदींना खुलं पत्र
  पत्रात संयुक्त किसान मोर्चाच्या 4 प्रमुख मागण्या
  लखीमपूर खेरी प्रकरणातील सहभागी केंद्रीय मंत्री
  'त्या' केंद्रीय मंत्र्यांना पदावरून हटवावं - किसान मोर्चा
  'आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत'
  शेतीसाठी डिझेलच्या किमती कमी करा - किसान मोर्चा
  देशातील पिकांच्या वैविध्यासाठी पॅकेज देण्याची मागणी
  MSP ची हमी देणारा कायदा लागू करा - संयुक्त किसान मोर्चा

  21:6 (IST)

  मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाची हजेरी
  नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात
  विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस
  अचानक पावसामुळे नवी मुंबईकरांची तारांबळ

  20:59 (IST)

  पुणे - चंद्रकांत पाटलांनीही भर पावसात भाषण ठोकलं
  नवी पेठेतील चौकाच्या नामकरण फलकाचं अनावरण

  19:28 (IST)

  मुंबई क्राईम ब्रँचची शिवडीत मोठी कारवाई
  5 कोटींचं ड्रग्ज जप्त, विदेशी नागरिकाला अटक

  17:57 (IST)

  अमरावती, नांदेड, मालेगावातील हिंसाचार प्रकरण
  हिंसाचाराविरोधात उद्या भाजपचं राज्यभर आंदोलन
  प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

  17:50 (IST)

  'सेना दूर गेल्यानंतर आमचं हिंदुत्व कमी झालं नाही'
  'सावरकरांवर जेव्हा टीका, तेव्हा सभागृह बंद पाडलं'
  'हिंदुत्वावर आघात झाल्यावर बाळासाहेब हल्ला करायचे'
  त्यावेळी अनेकांची हिंमत व्हायची नाही - चंद्रकांत पाटील
  आम्ही आमचं मिशन रक्तातच ठेवलंय - चंद्रकांत पाटील
  तावडेंचं अभिनंदन, मला व्यक्तिश: आनंद - पाटील
  'संयम आणि निष्ठा ठेवली की पुन्हा संधी मिळतेच'
  माध्यमं अर्थ लावतात, तसं काही नाही - चंद्रकांत पाटील
  पंकजा मुंडेंवर संघटनेची जबाबदारी आहे - पाटील
  'बावनकुळेंना 2 वर्षांनी संधी, इतरांनाही मिळेल'

  17:25 (IST)

  भाजप-शिवसेना एकत्र होती तेव्हा सावरकरांबद्दल 'ब्र' शब्द बोलायची कुणाची हिंमत नव्हती, जोपर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तोपर्यंत सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यानं मारच खाल्ला - चंद्रकांत पाटील

  17:6 (IST)

  विनोद तावडेंना भाजपमध्ये मोठी जबाबदारी
  विनोद तावडेंची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती
  पक्षाचे आणि सर्व वरिष्ठांचे आभार - विनोद तावडे
  'या पदावर अधिक सक्रिय राहून काम करता येईल'
  या संधीचा पुरेपूर वापर करणार - विनोद तावडे
  महाराष्ट्रात अशी संधी मिळणारे कमी लोक - तावडे
  केंद्रात राज्याचं ऐकलं जात नाही असं नाही - तावडे
  पक्षानं जी जबाबदारी दिली ती मी घेतली - तावडे
  मुंबईसाठीही मी काम करणार - विनोद तावडे

  17:2 (IST)

  सोलापूर - बबनराव घोलपांवर फेकली काळी शाई
  धनराज शिंदे या तरुणानं फेकली काळी शाई
  कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदेंसमोर घडला प्रकार
  राष्ट्रीय चर्मकार संघाच्या कार्यक्रमातील घटना

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स