• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: जोगेश्वरी-विक्रोळी JVLR उड्डाणपूल वाहतुकीसाठी उद्या सुरु होणार

Live Updates: जोगेश्वरी-विक्रोळी JVLR उड्डाणपूल वाहतुकीसाठी उद्या सुरु होणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 21, 2022, 20:29 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  21:50 (IST)

  'आधी इंधनाच्या किमती भरमसाठ वाढवायच्या...'
  '...नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव'
  दर कमी करण्याचा देखावा नको - उद्धव ठाकरे
  'आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवू नका'
  '6 ते 7 वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात करा'
  'तरच खऱ्या अर्थानं देशातील नागरिकांना दिलासा'
  केंद्राच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया  

  21:20 (IST)

  पुण्यात शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची बैठक
  सहकाऱ्यांच्या विधानांमुळे अस्वस्थता होती - पवार
  जातीवाचक बोलणाऱ्या नेत्यांना समज देणार पवार 
  एनसीपी नेत्यांनी जाती-धर्मावर बोलू नये - पवार 
  'ब्राह्मण समाजासाठी आर्थिक महामंडळाची मागणी'
  मागणीवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार - पवार
  'नवाब मलिकांवर अंतिम निर्णय आल्यावर बोलू'
  कोर्टाचं निरीक्षण हा अंतिम निर्णय नाही - पवार
  'शिवसेनेच्या उमेदवाराला शिल्लक मतं देणार'
  राज्यसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं वक्तव्य 

  19:8 (IST)

  देशवासीयांना केंद्राकडून मोठा दिलासा
  पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार
  केंद्र सरकारकडून अबकारी कर कमी
  पेट्रोल 9 रुपये 50 पैशांनी स्वस्त होणार
  डिझेलचे दर 7 रुपयांनी स्वस्त होणार
  उज्ज्वला योजनेत 200 रुपयांची सबसिडी
  केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांची माहिती
  12 घरगुती गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 200 रुपये सबसिडी 

  17:27 (IST)

  संदीप देशपांडे आणि संतोष धुरी प्रकरण
  कोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं
  'ही केस काल्पनिक, तथ्यावर आधारित नाही'
  कोर्टाचं निकालपत्रात स्पष्टीकरण
  'जाणीवपूर्वक इजा करण्याचा हेतू नव्हता'

  17:26 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या पुण्यात सभा
  गणेश कला क्रीडा मंडळात होणार सभा
  राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांची परवानगी
  स्वारगेट पोलिसांकडून अधिकृत परवानगी 

  16:40 (IST)

  औरंगाबादमध्ये भरदिवसा विद्यार्थिनीचा खून
  देवगिरी कॉलेज परिसरात धक्कादायक घटना
  विद्यार्थिनीला 200 फूट ओढत नेऊन खून
  एकतर्फी प्रेमातून घटनेचा पोलिसांचा अंदाज
  विद्यार्थिनीच्या खुनामुळे औरंगाबादेत खळबळ 

  16:40 (IST)

  पुण्याच्या लाल महालातील लावणीचा वाद पेटला
  राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेचंही आंदोलन
  लाल महाल लावणी प्रकरणात कारवाईची मागणी
  लाल महालाचं मराठा महासंघाकडून शुद्धीकरण
  महागाईविरोधात राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलन 

  16:40 (IST)

  औरंगाबादमध्ये 23 मे रोजी भाजपचा मोर्चा
  देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काढणार मोर्चा
  औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर भाजप आक्रमक
  'पोलिसांनी ठरवलेल्या मार्गावरून मोर्चा नाही'
  'भाजपनं ठरवलेल्या मार्गावरूनच परवानगी द्या'
  'पोलीस म्हणतायत औरंगपुऱ्यातून मोर्चा घेऊन जा'
  'भाजप सिटी चौकातूनच मोर्चा नेण्यावर ठाम'
  भाजपच्या मोर्चा परवानगीचा तिढा सुटता सुटेना 

  15:54 (IST)

  देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर निशाणा
  'ओबीसी आरक्षणासाठी अट्टहास का केला नाही?'
  'ओबीसी आरक्षणासाठी सरकारची धडपड का नाही?'
  'इम्पिरिकल डाटासाठी सरकारनं काही केलं नाही'
  'प्रयत्न केले असते तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं'
  'फक्त मलिकांच्या मंत्रिपदासाठी सरकारचे प्रयत्न'
  देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर निशाणा

  14:21 (IST)

  संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
  'मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विषयांवर चर्चा'
  राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा नाही - राऊत
  सहावी जागा शिवसेनेची - संजय राऊत
  'राज्यसभेवर शिवसेनेचाच उमेदवार जाणार'
  केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू - राऊत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स