• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: नवी मुंबईतील सर्व शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोमवारपासून सुरू होणार

Live Updates: नवी मुंबईतील सर्व शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोमवारपासून सुरू होणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 21, 2022, 15:40 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:9 (IST)

  द.आफ्रिका विरुद्ध भारत दुसरी वन-डे
  दुसऱ्या वन-डेतही भारताचा पराभव
  द.आफ्रिकेचा भारतावर दमदार विजय
  वन-डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी

  20:10 (IST)

  'विद्यापीठ, महाविद्यालय ऑफलाईन सुरू करणार'
  'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवला'
  उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांची माहिती

  20:9 (IST)

  विद्यापीठ आणि महाविद्यालय ऑफलाईन सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

  20:6 (IST)

  कचरा वर्गीकरण केंद्राबाबत होणार कारवाई, व्यापाऱ्यानं ठेवलं होतं वर्गीकरण केंद्रात साहित्य, 'त्या' व्यापाऱ्यासह संस्थेवर FIR दाखल करणार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती, 'त्या' संस्थेला काळ्या यादीत टाकणार, पालिकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार, 'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट

  18:59 (IST)

  गडचिरोली - भामरागड तालुक्यातील माओवाद्यांनी 12 वाहनं जाळली, धोडराज ते कवंडेदरम्यान सुरू आहे रस्त्याचं काम; 9 ट्रॅक्टर, 2 जेसीबी, 1 ग्रेडर गाडीचा समावेश

  18:29 (IST)

  'मनोहर पर्रिकर आयुष्यभर तत्त्वांसाठी लढले'
  मला पणजीच्या लोकांचा पाठिंबा आहे - पर्रिकर
  '2 वर्षांत पक्षात सत्ताकांक्षी लोकांची एन्ट्री झालीय'
  मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार - उत्पल पर्रिकर
  ही पणजीच्या लोकांची लढाई आहे - उत्पल पर्रिकर

  18:15 (IST)

  विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शाळांनी कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचा आवाहन, शाळा सुरू करण्यासाठीच्या तयारीचा घेतला आढावा

  18:12 (IST)

  लता मंगेशकरांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही
  ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार
  कोरोनासह न्यूमोनियाही झाल्यानं प्रकृती गंभीर
  गेल्या 10 दिवसांपासून ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू

  18:10 (IST)

  भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही.

  गेल्या दहा दिवसांपासून ब्रीच कँडी रूग्णालयातील आयसीयूमध्ये लतादीदींवर सुरू आहेत उपचार

  कोरोनाबरोबरच न्युमोनियाही झालेला असल्यानं प्रकृती गंभीर

  उपचारांना थोडाबहुत प्रतिसाद मिळत असला तरी अपेक्षेइतकी प्रकृतीत सुधारणा नाही

  उपचार करणा-या डॉक्टरांची वेट अँड वॉचची भूमिका.

  लता दीदींना ११ जानेवारी रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ब्रिच कँडी रूग्णालयातील ICU मध्ये केले होते दाखल

  18:3 (IST)

  प्रमोद सावंत यांची 'न्यूज18 लोकमत'ला मुलाखत
  'आपण अनेक तरुण उमेदवारांना संधी दिल्यात'
  आदित्य ठाकरेंनी प्रयत्न करून पाहावा - प्रमोद सावंत
  '​गोव्यात शिवसेनेपेक्षा 'नोटा'ला जास्त मतं पडतात'
  'नाराजीचा फायदा विरोधकांना होणार नाही'
  गोव्यात भाजप नक्की निवडून येणार - प्रमोद सावंत
  'खासगी क्षेत्रातही तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध'
  'सरकारी क्षेत्रात 70%हून अधिक नोकऱ्या भरल्या'
  गोव्याच्या समृद्धीसाठी मतदान करा - प्रमोद सावंत
  आम्ही स्वयंपूर्ण गोवा मोहीम चालवली - प्रमोद सावंत
  'पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणार'
  'आम्ही नवी टुरिझम पॉलिसी सुरू केलेली आहे'
  गोव्यातील क्राईम डिटेक्शन रेट 93% - प्रमोद सावंत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स