LIVE Updates : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,575 वर, तर 145 जणांचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 21, 2021, 21:18 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:21 (IST)

  मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल टँकरला आग 
  खेडमधल्या कळंबणी गावाजवळ भीषण आग 
  केमिकल टँकरला आग लागल्यानं धुराचे मोठे लोट
  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न
  मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू

  22:0 (IST)

  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन
  कल्याण सिंह यांनी 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  कल्याण सिंहांचं दीर्घ आजारामुळे उपचारादरम्यान निधन 

  20:58 (IST)

  राज्याची कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी
  दिवसभरात 10.77 लाख नागरिकांचं लसीकरण
  एका दिवसात लसीकरणाची सर्वाधिक आकडेवारी
  'कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं शस्त्र'
  'पुरवठा सुरळीत राहिल्यास मोठ्या संख्येनं लसीकरण'
  लसीकरणाच्या नव्या विक्रमासाठी प्रयत्न - आरोग्यमंत्री 

  19:26 (IST)

  शरीरसुखाच्या मागणी प्रकरणी चौकशी पूर्ण
  यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती
  माजी वनमंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट
  घाटंजी पोलिसांकडे महिलेनं पत्राद्वारे केली होती तक्रार 

  17:58 (IST)

  'बैलगाडा शर्यत बंदीविरोधात दाखल गुन्हे मागे घेणार'
  गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य
  'गुन्हे मागे घेणार म्हणून कायदा हातात घेऊ नका'
  वळसे पाटलांची आढळराव पाटलांना कोपरखळी
  'पुढील काळात बैलगाडा शर्यतींसाठी प्रयत्न करणार' 

  16:48 (IST)

  केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गंभीर आरोप
  एकनाथ शिंदेंची शिवसेनेत घुसमट - राणे
  'मातोश्रीला विचारल्याशिवाय सही अशक्य'
  नीलम गोऱ्हेंना मी शिवसेनेत आणलं - राणे
  'गोऱ्हेंच्या आमदारकीसाठीही मीच प्रयत्न केला'
  आता नीलम गोऱ्हेंची शिवसेनेत फरफट - राणे
  बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ दलदलीत का? - राणे
  स्वत:च्या पैशांनी स्मारक बनवा - नारायण राणे 

  15:2 (IST)

  नांदेड - मराठा मूक आंदोलन प्रकरण
  गर्दी जमवल्यामुळे 21 जणांवर गुन्हा दाखल
  वजिराबाद पोलिसात आयोजकांवर गुन्हा

  13:49 (IST)

  कोरोनाचं संकट अजून टळलं नाही - मुख्यमंत्री
  'नियम न पाळल्यास तिसरी लाट लवकर येईल'
  'लोकांचा जीव धोक्यात येईल असं काही करू नका'

  राजकीय, सामाजिक संघटनाना मुख्यमंत्र्यांची विनंती
  'इतर देशात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलाय'
  आपण सर्व गोष्टींची तयारी ठेवतोय - मुख्यमंत्री

  12:49 (IST)

  भारतीय नागरिकांचं अपहरण नाही - तालिबान
  150 भारतीयांना विमानतळावर नेलं - तालिबान
  नागरिकांना सुरक्षितस्थळी नेलंय, तालिबानचा दावा
  सर्व भारतीय काबूल विमानतळावर - तालिबान

  12:40 (IST)

  परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ
  सिंग यांच्याविरुद्ध गोरेगावमध्ये आणखी एक गुन्हा
  सिंग यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा
  ठेकेदार बिमल अग्रवाल यांनी केली होती तक्रार
  सिंग, सचिन वाझे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स