• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : मुंबई आंदोलन करणाऱ्या भाजपच्या आमदारांनी पोलिसांनी घेतले ताब्यात

LIVE : मुंबई आंदोलन करणाऱ्या भाजपच्या आमदारांनी पोलिसांनी घेतले ताब्यात

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 21, 2021, 12:51 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:20 (IST)

  राष्ट्रवादी कॉंग्रेसची दिल्लीत बैठक संपन्न
  शरद पवारांच्या निवासस्थानी अडीच तास बैठक
  पंढरपूर पोटनिवडणुकीबाबत चर्चा -जयंत पाटील
  'गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद‌्भवत नाही'
  चौकशीतून सत्य बाहेर येईल -जयंत पाटील
  'ज्यांनी गुन्हे केले त्यांना शोधून काढलं जाईल'
  गुन्ह्यांची सखोल चौकशी होणार -जयंत पाटील
  उद्या-परवा मित्रपक्षांशी करणार चर्चा -पाटील
  'मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न'
  'मंत्रिमंडळ फेरबदलाचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे' 

  21:16 (IST)

  राष्ट्रवादी कॉंग्रेसची दिल्लीत बैठक संपन्न
  शरद पवारांच्या निवासस्थानी अडीच तास बैठक
  पंढरपूर पोटनिवडणुकीबाबत चर्चा -जयंत पाटील
  'गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद‌्भवत नाही'
  चौकशीतून सत्य बाहेर येईल -जयंत पाटील
  'ज्यांनी गुन्हे केले त्यांना शोधून काढलं जाईल'
  गुन्ह्यांची सखोल चौकशी होणार -जयंत पाटील
  उद्या-परवा मित्रपक्षांशी करणार चर्चा -पाटील
  'मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न'
  'मंत्रिमंडळ फेरबदलाचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे' 

  20:40 (IST)

  कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे
  उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या
  बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., भाग 3 च्या परीक्षा
  तांत्रिक कारणास्तव परीक्षा पुढे ढकलल्या
  नवं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार 

  20:37 (IST)

  राज्यात कोरोनाचं संकट आणखी गडद
  राज्यात कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ
  राज्यात दिवसभरात 30 हजारांच्यावर रुग्ण
  राज्यात दिवसभरात 30,535 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 99 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 11,314 कोरोनामुक्त
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.32 टक्के
  राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 10,120 

  19:33 (IST)

  कॉंग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल यांची पवारांशी चर्चा -सूत्र
  राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती
  परमबीर सिंगांनी केलेल्या गंभीर आरोपांवरही चर्चा -सूत्र 

  19:30 (IST)

  नांदेडमध्ये 11 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
  नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल लॉकडाऊन
  जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचे आदेश
  'न्यूज18 लोकमत'नं सर्वप्रथम दाखवली बातमी
  चिकन, मटण घरपोच पुरवठा करण्याची मुभा
  वैद्यकीय कारणासाठी वाहतुकीला परवानगी
  नांदेडमध्ये बँका सुरू मात्र ग्राहकांना प्रवेश नाही
  भाजीपाला, फळ विक्री सकाळी 7 ते 10 पर्यंत
  नांदेडमध्ये किराणा दुकानं दुपारी 12 वाजेपर्यंत
  पेट्रोल, गॅस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी
  घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुरू राहणार
  नांदेडमध्ये शेतीविषयक व्यवहार राहणार सुरू

  19:23 (IST)

  मनसुख हत्या प्रकरण 'एनआयए'कडे सुपूर्द
  राज्य सरकारला 'एनआयए'चं नोटिफिकेशन
  सर्व कागदपत्रं, आरोपी 'एनआयए'कडे देणार
  राज्य सरकार कोणत्याही क्षणी करणार घोषणा  

  19:23 (IST)

  'मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं'
  मनसुख हिरेन यांची हत्याच -शिवदीप लांडे
  'माझ्या करिअरमधील सर्वात गुंतागुंतीची केस'
  ATS डीआयजी शिवदीप लांडेंची फेसबुक पोस्ट 

  17:57 (IST)

  कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार
  गडहिंग्लज आणि नेसरी भागात जोरदार पाऊस 
  जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण
  अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची दाणादाण
  गारपिटीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
  रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार
  गावातल्या आठवडी बाजारांवर पावसाचा परिणाम

  16:26 (IST)

  केडीएमसी आयुक्तांनी मॉल आणि रेस्टॉरंटला दिली अचानक भेट, निर्बंध अधिक कडक करण्याचा आयुक्तांचा  इशारा


   कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी रात्री अचानक कल्याण शहरातील दुकानं आणि रेस्टॉरंटला भेट दिली, यावेळी कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यामुळे दुकानं आणि रेस्टॉरंटच्या मालकांना त्यांनी चांगलेच झापले. त्यामुळे शहरात घातलेले निर्बध आणि कोरोना नियमांचे पालन गर्दीची ठिकाणं असलेल्या मॉल आणि हॉटेल, रेस्टॉरंट इथे होत आहेत का याचा केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आढावा घेतला.


  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स