LIVE: प्रशांत किशोर- शरद पवार यांच्या भेटीवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 21, 2021, 15:38 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:9 (IST)

  'राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण आढळले'
  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
  'तपासणीसाठी राज्यभरातून 7500 नमुने पाठवले'

  21:24 (IST)

  'मुख्यमंत्र्यांसोबत तिसऱ्या लाटेबाबत बैठक झाली' 
  ग्रामीण रुग्णव्यवस्थेवर बैठकीत भर - राजेश टोपे
  लहान मुलं, नव्या व्हायरसच्या रूपांतरावर लक्ष - टोपे
  'महाराष्ट्रात उद्यापासून 18+ नागरिकांचं लसीकरण'
  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

  21:15 (IST)

  महाविकास आघाडी समन्वय समितीची उद्या बैठक
  'सह्याद्री'वर उद्या संध्याकाळी 5 वाजता बैठक
  वेगवेगळ्या वादाच्या मुद्यावर चर्चेची शक्यता
  तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बैठकीत होणार सहभागी

  20:31 (IST)

  राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
  कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येतही घट
  राज्यात दिवसभरात 6,270 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 94 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 13,758 कोरोनामुक्त
  राज्यात सध्या 1 लाख 24,398 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:30 (IST)

  शालेय पोषण आहाराच्या ऑडिट घोषणेमुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलं अभिनंदन, केवळ सामाजिक नाही तर सर्वसमावेशक ऑडिट व्हावं; अनेक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, गुंतलेले अधिकारी, संस्था यांचा पर्दाफाश होईल - प्रवीण दरेकर

  20:1 (IST)

  'शालेय पोषण आहार योजनेचं होणार ऑडिट'
  आहार योजनेत पारदर्शकता आणणार - वर्षा गायकवाड
  शालेय शिक्षणमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय
  'पुरवठादारांकडून निकृष्ट मालाचा पुरवठा'
  तक्रारी आल्यानं ऑडिटचा निर्णय - वर्षा गायकवाड

  19:55 (IST)

  वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपरिषदेतील 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

  19:26 (IST)

  मेधा कुलकर्णींची भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती
  कोथरूडमधून आमदारकीचं तिकीट कापल्यानं होत्या नाराज
  मेधा कुलकर्णींचं थेट राष्ट्रीय स्तरावर राजकीय पुनर्वसन

  19:23 (IST)

  प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंसह कुटुंबीयांची 40 कोटींची मालमत्ता जप्त, फेमा कायद्यांतर्गत ईडीची कारवाई

  19:7 (IST)

  सीएमनी बैठक घेऊन चर्चा केली पाहिजे - सुधीर मुनगंटीवार
  'सर्वपक्षीय नेत्यांची, अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी'
  'सर्वांनी गांभीर्यानं विचार करून नाव दिलं पाहिजे'
  नवी मुंबई विमानतळ नामांतर वादावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स