liveLIVE NOW

LIVE Updates: चंद्राकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस गांभीर्यानं घेत नाही- नाना पटोले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 20, 2021, 15:28 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:7 (IST)

  नाशिक - पोलीस अधीक्षक सचिन पाटलांच्या बदलीला कोर्टाची स्थगिती, डिसेंबरअखेर बदली न करण्याचे राज्य सरकारला निर्देश, मुंबईच्या कोर्टात दाखल याचिकेवर 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय

  22:2 (IST)

  दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारती, कार्यालयं, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावा, आदित्य ठाकरेंची मुंबई महापालिकेला सूचना, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोठं पाऊल

  22:2 (IST)

  कोरोनाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत शासन प्रयत्नशील, मुंबई उपनगरातील लसीकरणाचा घेतला आढावा तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी सुविधांचाही आढावा

  20:33 (IST)

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन - पंतप्रधान मोदींमध्ये बैठक
  24 सप्टेंबरला महत्वाची द्विपक्षीय बैठक होणार

  19:27 (IST)

  कॉंग्रेसकडून रजनी पाटलांची राज्यसभेसाठी शिफारस
  विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातवांची होऊ शकते शिफारस
  वि.परिषदेसाठी रजनी पाटलांचं नाव राज्यपालांकडे दिलंय
  काँग्रेसला त्या जागेवर उमेदवार द्यावा लागणार
  या जागेसाठी प्रज्ञा सातवांना मिळू शकते उमेदवारी

  19:22 (IST)

  परभणी - सोनपेठ तालुक्यातील धक्कादायक घटना
  16 वर्षांच्या मुलीवर तिघांकडून बलात्कार
  घटनेनंतर मुलीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
  पीडित मुलीवर लातूरच्या रुग्णालयात उपचार
  सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू
  पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना घेतलं ताब्यात

  19:5 (IST)

  महापालिकेत एक सदस्य की बहुसदस्य प्रभाग पद्धती असावी याबाबत समन्वय समितीत चर्चा झाली, यात आणखी 
  मंथन झाल्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

  19:0 (IST)

  सिंधुदुर्ग - 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद‌्घाटन
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य राहणार उपस्थित
  'नारायण राणेंच्या उपस्थितीचा निर्णय MIDC घेणार'
  MIDC प्रोटोकॉलनुसार घेणार निर्णय - उदय सामंत

  18:37 (IST)

  'मविआ' समन्वय समितीची पार पडली बैठक
  आगामी मनपा निवडणुकीत प्रभाग रचनेवर चर्चा
  उद्या संध्याकाळी सह्याद्रीवर पुन्हा या विषयावर बैठक
  आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही

  18:31 (IST)

  सत्ता गेल्यानं चंद्रकांत पाटलांचा तोल ढासळलाय - चंद्रकांत पाटील
  कोण कोणाला खिशात घालेल एवढा मोठा कोणी नाही, सुनील तटकरेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स