liveLIVE NOW

Live Updates: सांगलीच्या विटा नगरपालिकेनं पटकावला स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम पुरस्कार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 20, 2021, 21:45 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 7 DAYS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:23 (IST)

  मी उद्या अमरावतीला जाणार आहे, हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना भेटेन, मात्र त्रिपुराच्या ज्या काल्पनिक घटनेवर हिंसाचाराला सुरुवात झाली त्यावर शरद पवार का बोलत नाहीत, देवेंद्र फडणवीसांचा सवाल, शरद पवारांना आपला पक्ष चालवावा लागतो त्यामुळे त्यांनी अनिल देशमुखांचं समर्थन केलं - देवेंद्र फडणवीस

  20:59 (IST)

  देवेंद्र फडणवीस उद्या अमरावतीला जाणार
  फडणवीस हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा करणार
  'त्रिपुराच्या काल्पनिक घटनेवर हिंसाचार झाला'
  त्यावर पवार का बोलत नाहीत? फडणवीसांचा सवाल
  'शरद पवारांना आपला पक्ष चालवावा लागतो'
  त्यामुळे पवारांकडून देशमुखांचं समर्थन - फडणवीस

  20:28 (IST)

  राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील - प्रवीण दरेकर

  20:0 (IST)

  महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्रातील 3 नगरपालिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नगरपालिकांचं अभिनंदन, महाराष्ट्रानं स्वच्छ सर्वेक्षणात देशातील दुसरा क्रमांक पटकावला

  19:4 (IST)

  राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच
  राज्य सरकारविरोधात कर्मचाऱ्यांचा आक्रोश
  विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम
  विलीनीकरणाबाबत चर्चा झाली - अनिल परब
  हायकोर्टानं समितीला अधिकार दिलेत - परब
  विलीनीकरणावर समिती निर्णय घेईल - परब
  'हायकोर्टाच्या निर्णयात फेरफार करता येणार नाही'
  'आडमुठेपणाची भूमिका नाही, सामंजस्याची भूमिका'
  एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्याचं काम सुरू - परब
  विरोधकांकडून राजकारण सुरू - अनिल परब
  एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा - अनिल परब
  परिवहन मंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

  18:22 (IST)

  नाशिक - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक जावेद अख्तर, शरद पवार आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळांची घोषणा

  16:27 (IST)

  अहमदनगर - बोगस बायोडिझेल प्रकरणात आरोपी संजय साबळे तोफखाना पोलीस ठाण्यात दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग, 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

  16:5 (IST)

  क्रुझवरील आर्यन खान ड्रग्ज प्रकरण
  मुंबई हायकोर्टानं नोंदवलं महत्वपूर्ण निरीक्षण
  आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा
  'ड्रग्ज सापडलेत असं प्रथमदर्शनी दिसत नाही'
  गुन्ह्यात सहभाग हे या टप्प्यावर सांगणं कठीण - कोर्ट
  'व्हॉट‌्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही'
  तिघांनाही 28 ऑक्टोबरला मिळाला होता जामीन
  'त्या' जामिनाच्या आदेशाची प्रत आज जाहीर
  न्यायमूर्ती एन.डब्ल्यू. सांबरे यांनी नोंदवलं निरीक्षण

  15:29 (IST)

  पहिली ते पाचवीच्या शाळांसाठी मोठी बातमी
  'शाळा सुरू करण्यास टास्क फोर्स अनुकूल नाही'
  'लसीकरणाशिवाय शाळा सुरू करणं योग्य होणार नाही'
  टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक यांचं वक्तव्य
  शिक्षण विभाग अनुकूल, टास्क फोर्सचा मात्र विरोध

  15:17 (IST)

  भावना गवळींना ईडीकडून पुन्हा समन्स
  24 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
  भावना गवळींनी वेळ मागून घेतली होती
  प्रकृतीचं कारण देत चौकशीला राहिलेल्या गैरहजर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स