Live Updates: राज्यात आज एकही ओमायक्रॉनचा रुग्ण नाही!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 20, 2021, 20:18 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:7 (IST)
  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटीचा संप मागे घेत असल्याची घोषणा करत कामगारांना कामावर रुजू होण्याचं केलं आवाहन, त्यामुळे उद्यापासून एसटीची वाहतूक पूर्ववत होणार - अनिल परब
   
  21:58 (IST)

  आझाद मैदानातील कर्मचारी मात्र संपावर ठाम
  अजय गुजर यांचा निर्णय अमान्य - कर्मचारी
  विलीकरणाचा लढा सुरूच राहणार - कर्मचारी
  एसटी संप सुरूच ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार

  21:47 (IST)

  इलेक्ट्रिक वाहनांबाबत शॅले हॉटेल्सचा पुढाकार कौतुकास्पद, इतर आस्थापनांनीही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

  21:19 (IST)

  संपातून माघार घेण्याचा अजय गुजर यांचा निर्णय
  विलीनीकरण्याच्या मागणीवर आजही ठाम - गुजर
  त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मान्य करू - गुजर
  वेतनश्रेणीत सुधारणा करण्याचं आश्वासन - गुजर
  मृतांच्या वारसांना 50 लाख रुपये द्यावेत - गुजर
  कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी - गुजर
  विविध मुद्यांवर राज्य सरकारशी चर्चा - गुजर
  विलीनीकरणाचा लढा देतच राहू - अजय गुजर
  'कामावर आल्यास निलंबनाची कारवाई रद्द'
  न्यायालय देईल तो निर्णय मान्य - अजय गुजर
  गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊ - गुजर
  एसटी संपाची नोटीस आम्ही दिली होती - गुजर
  त्यामुळे आम्ही संप मागे घेतोय - अजय गुजर
  अटी-शर्थींसह एसटी संप मागे - अजय गुजर
  अजय गुजर प्रणीत संघटनेकडून संप मागे
  एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन
  '22 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं'
  सदावर्ते - आमच्यात फूट पडलेली नाही - गुजर
  आझाद मैदानावर जाऊन चर्चा करणार - गुजर
  आझाद मैदानातील आंदोलक कर्मचारी आक्रमक
  अजय गुजर यांचा निर्णय अमान्य - कर्मचारी
  विलीकरणाचा लढा सुरूच राहणार - कर्मचारी
  संप सुरूच ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार

  21:19 (IST)

  3 नोव्हेंबरपासून संप सुरू आहे - अनिल परब
  'कर्मचाऱ्यांशी सतत वाटाघाटी सुरू होत्या'
  12 आठवड्यांत समिती अहवाल देणार - परब
  कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ दिली - परब
  'आमच्या चर्चेला कर्मचारी संघटनांचा प्रतिसाद'
  'आवाहनाला कर्मचाऱ्यांच्या युनियनचा प्रतिसाद'
  संपकरी संघटनांशी आज आम्ही चर्चा केली - परब
  समितीचा अहवाल आम्हाला मान्य - अनिल परब
  'विलीनीकरणाचा मुद्दा त्रिसदस्यीय समितीसमोर'
  हा अहवाल दोघांनाही मान्य असेल - अनिल परब
  'कर्मचारी हजर झाल्यास कारवाई मागे घेऊ'
  'शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगाराची मागणी'
  आर्थिक मागण्या केल्या मान्य - परिवहन मंत्री
  10 तारखेच्या आत पगार होईल अशी हमी - परब
  अन्य मागण्यांवर चर्चा होऊ शकते - अनिल परब
  'त्या' कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीबाबत सकारात्मक
  '22 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं'
  'बाहेरगावच्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सवलत'
  गावकरी आणि लालपरीची नाळ तुटली - अनिल परब
  तुटलेली नाळ जोडण्यासाठी प्रतिसाद द्यावा - परब

  19:50 (IST)

  टीईटी परीक्षेतील घोळाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं गठित केली 6 सदस्यीय समिती; अप्पर मुख्य सचिव शिक्षण विभागाच्या अध्यक्षतेखाली समिती, या समितीनं 7 दिवसांत प्राथमिक तर 15 दिवसांत सविस्तर अहवाल शिक्षणमंत्र्यांना द्यावा

  19:47 (IST)

  मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

  19:14 (IST)

  अभिनेत्री ऐश्वर्या रायची झाली ईडी चौकशी
  पनामा पेपर लीकप्रकरणी दिल्लीत चौकशी

  18:7 (IST)

  बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सुरू होणार आयबी बोर्डाचं आंतरराष्ट्रीय शिक्षण, पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि आयबी बोर्ड पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न

  17:56 (IST)

  'मोठ्या पार्टी, सेलिब्रेशनला मुंबईत परवानगी नाही'
  गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि जुहू बीच
  लोकांना एकत्र येऊ दिलं जाणार नाही - अस्लम शेख
  'मुंबईत गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणार'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स