LIVE Updates: शिवसेनेनं टीका करणं सोडून जनतेचं काम करावं, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | August 20, 2021, 15:47 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    21:49 (IST)

    राज्यात दिवसभरात 4 हजार 365 नवीन रुग्ण
    राज्यात दिवसभरात 6 हजार 384 कोरोनामुक्त
    राज्यात दिवसभरात 105 रुग्णांचा मृत्यू
    मुंबईत दिवसभरात 319 रुग्ण, 6 रुग्णांचा मृत्यू

    21:21 (IST)

    रायगडच्या जिल्हा अधिकारी निधी चौधरींची बदली

    20:50 (IST)

    सरकार स्थापनेचा मुहूर्त काढायला अजून ज्योतिषी मिळाला नाही, मात्र आम्ही लवकरच ठरवू - नारायण राणे

    20:43 (IST)

    गणेशोत्सव झाल्यानंतर राज्यातील कोरोनाची काय स्थिती आहे हे पाहून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल - डॉ.ओक, टास्क फोर्सप्रमुख

    20:12 (IST)

    सांगली - आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा
    संचारबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा
    पडळकरांसह 41 कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल
    विनापरवाना बैलगाडा शर्यत घेतल्यानं कारवाई

    19:52 (IST)

    देशात स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या लसीला मान्यता
    झायडस कॅडिलाच्या झायकोव्ही-डी लसीला मंजुरी
    आपत्कालीन वापरास डीसीजीआयकडून मंजुरी

    18:22 (IST)

    सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पुणे दौरा
    राजनाथ सिंह आर्मी स्पोर्ट‌्स इन्स्टिट्यूटला भेट देणार
    इन्स्टिट्यूटमधील क्रीडांगणाला नीरज चोप्राचं नाव देणार
    16 ऑलिम्पियन्सचा राजनाथ सिंह सत्कार करणार

    18:16 (IST)

    विरोधकांची एकजूट कायम राहील - सोनिया गांधी
    2024 लोकसभा निवडणुका अंतिम लक्ष्य - सोनिया
    'हे एक आव्हान पण एकत्र आपण ते करू शकतो'
    पद्धतशीर नियोजन करावं लागेल - सोनिया गांधी

    18:11 (IST)

    'पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही'
    कायम वंचित घटकांना बरोबर घेतलं - अंकुश काकडे
    राज ठाकरेंना प्रसिद्धीची हौस - अंकुश काकडे
    'पवारांसारख्या शक्तिस्थळावर हल्ला करायची ही पद्धत'

    17:25 (IST)

    'सोनियांनी बैठक बोलावली, हे महत्वपूर्ण पाऊल'
    यूपीए मजबूत होतेय, अशोक चव्हाणांचं वक्तव्य
    'यूपीएमध्ये शिवसेना आली तर अधिक मजबूत होईल'

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स