LIVE : नागपूरमध्ये एकाच दिवसात 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 20, 2021, 17:15 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    21:43 (IST)

    माझ्यावर केलेले आरोप खोटे -अनिल देशमुख
    गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण
    'परमबीर सिंगांचा सरकारला ब्लकमेलचा प्रयत्न'
    'वाझेला अटक झाल्यावर परमबीर शांत का?'
    'त्यावेळी त्यांनी आपलं तोंड का उघडलं नाही?'
    अनिल देशमुखांचा परमबीर सिंगांवर पलटवार
    'स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर यांचे खोटे आरोप'
    'कायदेशीर कारवाईपासून बचावासाठी आरोप'
    गृहमंत्री अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

    21:9 (IST)

    अजून एक मंत्री सुपात आहे, कोणत्याही क्षणी जात्यात येईल -प्रवीण दरेकर

    20:49 (IST)

    '22 मार्चला राज्यपालांना भेटून मागणी करणार'
    राज्य सरकार बरखास्त करा -प्रकाश आंबेडकर

    20:43 (IST)

    परमबीर सिंगांचं 'ते' पत्र धक्कादायक -राज ठाकरे
    'महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना'
    'गृहमंत्री देशमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा'
    याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीही व्हावी -राज ठाकरे

    20:4 (IST)

    सावधान ! राज्यात कोरोनाचा विळखा
    राज्यात दिवसभरात 27,126 नवीन रुग्ण
    राज्यात दिवसभरात 92 रुग्णांचा मृत्यू
    राज्यात दिवसभरात 13,588 कोरोनामुक्त
    रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.97 टक्के
    राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 91,006

    19:52 (IST)

    पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आदित्य ठाकरेंचं आवाहन

    19:38 (IST)

    परमबीर सिंगांचं पत्र धक्कादायक -फडणवीस
    'गृहमंत्र्यांबद्दल अशा प्रकारचं पत्र ही पहिलीच वेळ'
    गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा -फडणवीस
    'निरपेक्ष चौकशीसाठी त्यांचा राजीनामा घ्यावा'
    पोलीस दलाचं खच्चीकरण होतंय -फडणवीस
    यासंदर्भात कडक कारवाई व्हावी -फडणवीस
    'सरकार वाचवण्यासाठी पत्राकडे दुर्लक्ष नको'
    हे प्रकरण अतिशय गंभीर -देवेंद्र फडणवीस
    परमबीर सिंगांचं पत्र खळबळजनक -दरेकर
    गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा -दरेकर

    19:34 (IST)

    गृहमंत्री अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले
    'स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर यांचे खोटे आरोप'
    'कायदेशीर कारवाईपासून बचावासाठी आरोप'
    परमबीर सिंगांचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले

    18:36 (IST)

    महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारी बातमी
    परमबीर सिंग यांच्या पत्रानं राजकीय भूकंप
    परमबीर सिंग यांच्या 'लेटरबॉम्ब'नं खळबळ
    परमबीर सिंगांचे गृहमंत्री देशमुखांवर गंभीर आरोप
    खंडणी जमवण्याच्या गृहमंत्र्यांच्या सूचना -सिंग
    माजी पोलीस आयुक्तांचा खळबळजनक दावा

    17:57 (IST)

    राज्यातील काही भागात पाऊस आणि गारपीट
    ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाल्याचं मोठं नुकसान

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स