LIVE : बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा उद्या महामोर्चा, शिवसेनाही होणार सहभागी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 20, 2021, 18:22 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:21 (IST)

  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा
  शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची हजेरी
  अमेरिकेत बायडन युगाचा आरंभ
  जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष
  जो बायडन यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
  कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ
  प्रथमच भारतीय वंशाच्या महिलेला मोठं पद
  डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हाईट हाऊसला निरोप
  4 वर्षं राष्ट्राध्यक्ष राहिल्याचा आनंद -ट्रम्प
  परिवार आणि मित्रवर्गाचे मानले आभार

  22:10 (IST)

  अभिनेत्री कंगना राणावतला जुहू पोलिसांनी बजावलं समन्स, 22 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश, जावेद अख्तर यांनी कंगनावर केला होता मानहानीचा दावा

  20:52 (IST)

  नितीन राऊतांनी जबाबदारी घ्यावी -चंद्रकांत पाटील
  '...अन्यथा ऊर्जामंत्रिपदाचा राजीनामा द्यावा'
  विजेबाबात आपली भूमिका बदलू नये -पाटील
  'कोरोना काळात लोकांना मोठ्या प्रमाणात बिलं'
  वीजबिल सवलतीचं काय झालं? -चंद्रकांत पाटील
  'सरकार मराठा, ओबीसीत वाद निर्माण करतंय'
  मराठा तरुणांमध्ये नैराश्य आलंय -चंद्रकांत पाटील
  'कृषी कायद्यांबाबत केंद्राचा समजूतदारपणा'
  चंद्रकांतदादांनी सुरक्षेबद्दल मोदीजींचे मानले आभार

  20:26 (IST)

  राज्यात सायंकाळी 7 पर्यंत 18 हजार 166 कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण, तीन लसीकरण सत्रांमध्ये आतापर्यंत 51 हजार 650 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली

  20:0 (IST)

  25 तारखेपासून पुण्यातली उद्यान खुली होणार, पुणे महापालिकेकडून आदेश पारित

  19:55 (IST)

  बृहन्मुंबईचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचा मसुदा अंतिम करण्यासाठी संबंधित संस्थेस सूचित करावं, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंची केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

  19:54 (IST)

  कॅबिनेटनंतर शिवसेना मंत्र्यांची 'वर्षा'वर बैठक
  ग्रा.पं. निवडणुका, आगामी निवडणुकांवर चर्चा
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आढावा
  बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित
  कोरोनानंतरच्या परिस्थितीचाही आढावा सुरू

  19:45 (IST)

  काँग्रेस कार्य समितीची 22 तारखेला बैठक
  काँग्रेस अध्यक्ष निवड प्रक्रियेसंदर्भात चर्चा
  सोनिया गांधी, राहुल, प्रियंका हजर राहणार
  देशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होणार सहभागी
  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक

  19:39 (IST)
  नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय -पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
  19:39 (IST)

  राज्यातील 3 कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद, गरीब आणि मजूरवर्गाला शिवभोजनचा मोठा आधार -छगन भुजबळ

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स