Live Updates : महाराष्ट्रात कोरोना कमी होतोय, दिवसभरात 14 हजार 372 रुग्ण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 01, 2022, 23:31 IST
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:28 (IST)

  महाराष्ट्रात कोरोना कमी होतोय, दिवसभरात 14 हजार 372 रुग्ण, 94 रुग्णांच्या मृत्यूची नोंद, दिवसभरात 30 हजार 093  रुग्णांची कोरोनावर मात

  22:18 (IST)

  मुंबई महापालिका निवडणुकीचा मंत्री आदित्य ठाकरेंकडून आढावा, 'मविआ'ला जनतेकडून राज्यभर पाठिंबा, प्रभाग रचना अहवालावर अभ्यास सुरू - आदित्य ठाकरे

  22:17 (IST)

  मुंबई महापालिका निवडणुकीचा आढावा
  मंत्री आदित्य ठाकरेंकडून आढावा
  'मविआला जनतेकडून राज्यभर पाठिंबा'
  'प्रभाग रचना अहवालावर अभ्यास सुरू'

  22:15 (IST)

  भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई
  स्फोटकसामग्री जप्त, तिघांना घेतलं ताब्यात
  अल्पेश पाटील, पंकज चव्हाण, समीर वेडगा ताब्यात
  निजामपुरा पोलीस हद्दीत नदीनाका इथं कारवाई
  आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

  22:4 (IST)

  भिवंडीत स्फोटक सामुग्री जप्त करून तीन जणांना क्राईम पोलिसांनी  घेतलं ताब्यात

  मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका आगामी  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची मोठी कारवाई

  स्फोट घडवून आणण्याची सुमारे साडेचार लाख रुपयांचे स्फोटक सामुग्री जप्त करून तीन  जणांना घेतलं ताब्यात

  निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीनाका इथं केली कारवाई

  अल्पेश पाटील, पंकज चव्हाण, समीर वेडगा अशी आरोपींची नावे

  1 हजार जिलेटीन नग, 1 हजार डीटोनेटर नग आणि इको कार केली जप्त

  22:2 (IST)

  पंढरपूर :

  वेळापूरमध्ये तरुणावर गोळीबार

  प्रविण शशिकांत सावंत या युवकावर मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार

  सांगोला-वेळापूर रोडवर चारचाकी गाडी थांबवून वडापाव घेण्यासाठी उतरले असता प्रविण सावंत या युवकावर झाला गोळीबार

  अज्ञात व्यक्तींकडून झाडण्यात आलेल्या गोळीबारात युवक बचावला

  याप्रकरणी वेळापूर पोलीस तपास करीत असून अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

  21:40 (IST)


  पनवेल - कामोठेतील सेक्टर 11 मध्ये आग
  भोजनालयातील सिलेंडरच्या स्फोटानं आग
  अग्निशमनला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
  आगीत 2 घरांचं मोठं नुकसान, जीवितहानी नाही

  21:33 (IST)

  भोजनालयातील सिलेंडरचा स्फोट होवून लागली आग,  बाजूच्या दोन घरांचे मोठे नुकसान, पनवेलच्या कामोठे वसाहतीमधील घटना

  21:19 (IST)

  - आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज 16 फेब्रुवारीपासून भरता येणार

  -शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती 

  20:38 (IST)

  नाशिक कोरोना अपडेट :
  - कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं झाली सुधारणा
  - नवे रुग्णसंख्या झाली कमी तर बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ
  - जिल्ह्यात दिवसभरात नवे 1482 रुग्ण
  - तर 2874 झाले बरे
  - मात्र, जिल्ह्यात 6 बळीची नोंद
  - आतापर्यंत कोरोना बळींची संख्या 8 हजार 818
   - जिल्ह्यात नाशिक शहर हॉटस्पॉट कायम 
  - शहरात नवे 868 रुग्ण

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स