liveLIVE NOW

Live Updates : इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 20, 2021, 00:02 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:8 (IST)

  नागपूर - पारडी भागात निर्माणाधीन पुलाचा काही भाग कोसळला, घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

  21:19 (IST)

  पॅरोलवर आल्यानंतर खून करणारा आरोपी जेरबंद
  दक्षिण सोलापूरच्या वडापूर इथं केला होता खून
  पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून केलेलं कृत्य
  फरार आरोपी आमसिद्ध पुजारी अखेर अटकेत
  मंद्रूप पोलिसांची वडापूर गावच्या हद्दीत कारवाई
  2009 साली संशयातून पत्नीचाही केला होता खून

  20:18 (IST)

  पिंपरी-चिंचवड आयुक्तालय पोलीस भरती परीक्षा 23 ऑक्टोबरऐवजी 19 नोव्हेंबरला होणार, नियोजनशून्य कारभाराचा पुन्हा उमेदवारांना फटका, 2019 ची भरती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत

  19:53 (IST)

  ज्या लोकांनी लस मिळाली नाही म्हणून टीका केली होती, त्यांनी महाराष्ट्रात 9 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालं याबाबत कौतुक केलं पाहिजे - भारती पवार

  19:7 (IST)

  नव्या नियुक्तीनंतर मुंबई कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य
  सचिन सावंतांचा कॉंग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा
  नवीन पदाची जबाबदारी देण्याची केली मागणी

  18:30 (IST)

  'लहान मुलांच्या लसीकरणाबाबत लवकरच मंजुरी'
  'केंद्र आणि मोदी लसीकरणासाठी आग्रही राहिले'
  देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं - भारती पवार
  'तिसऱ्या लाटेची शक्यता कमी, खबरदारी घेणं गरजेचं'

  18:23 (IST)

  दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या, दुपारी 1 वाजता www.mahresult.nic.in वर जाहीर होणार, वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार

  17:53 (IST)

  अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक
  साखर उद्योग, सहकार क्षेत्रासंबंधी चर्चा - फडणवीस
  'साखर कारखान्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार'
  'सहकारी साखर कारखान्यांना मदतीवर चर्चा'
  साखर कारखान्यांचे प्रश्न सोडवणार - फडणवीस
  'महाराष्ट्रातील कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल'
  आयकरच्या नोटिसांवर तोडगा काढणार - फडणवीस
  'कोणत्याही कारखान्यावर कारवाई होणार नाही'
  'सहकारी कारखान्यांना उभारी देण्याचा प्रयत्न'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

  17:16 (IST)

  कृषी व संलग्न महाविद्यालयं उद्यापासून सुरू करण्यास मान्यता, कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांचं पालन करण्याचं केलं आवाहन, स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची कृषिमंत्री दादाजी भुसेंची सूचना

  16:39 (IST)

  राज ठाकरेंचा मुंबईत 23 तारखेला मेळावा
  कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू - नितीन सरदेसाई
  'कोरोना नियमांचं पालन करून मेळावा होणार'
  मनपा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी - सरदेसाई

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स