liveLIVE NOW

Live Updates: अमरावती जिल्ह्यातील आठवडाभरापासून बंद असलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 19, 2021, 15:52 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 13 DAYS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:54 (IST)

  देवळा - कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

  21:30 (IST)

  विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची नावं जाहीर
  कोल्हापुरातून अमन महाडिक, धुळ्यातून अमरिश पटेल
  नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी
  अकोल्यातून वसंत खंडेलवाल, मुंबईतून राजहंस सिंग

  19:1 (IST)

  'एसटीतला भ्रष्टाचार थांबवा, परिस्थिती सुधारेल'
  भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा
  संपावर तोडग्यासाठी सरकारची चालढकल - पडळकर

  18:58 (IST)

  गडचिरोलीतील माओवादी चकमकीचं प्रकरण, 27 नोव्हेंबरला माओवाद्यांचं 6 राज्यांत बंदचं आवाहन, माओवाद्यांच्या केंद्रीय समितीनं जारी केलं पत्रक, तेलतुंबडे चळवळीत होता सक्रिय, माओवाद्यांची कबुली

  18:50 (IST)
  चिपळूण बचाव समितीची बैठक संपन्न, वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी साखळी उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय, 6 डिसेंबरपासून साखळी उपोषणाला होणार सुरुवात, सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांचा निर्धार, 23 नोव्हेंबरपासून प्रत्येक वॉर्डमधून माहिती देण्यासाठी निघणार पदयात्रा
   
  18:46 (IST)

  आज 238 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त
  297 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

  18:34 (IST)

  अवैधरीत्या फर्नेश ऑईल तस्करी करणाऱ्यांना बेड्या
  तिघांना शिवडी बंदर रोड परिसरातून केली अटक
  वडाळा पोलीस विभागाची धडाकेबाज कारवाई
  ACP केशव शेंगळे आणि टीमकडून तिघांना अटक
  कारवाईत 13,500 हजार लीटर फर्नेश ऑईल जप्त

  17:15 (IST)

  शिवसेनेकडून मुंबईतून विधान परिषदेसाठी सुनील शिंदेंना उमेदवारी, रामदास कदमांचा पत्ता कट, अनिल परब प्रकरणातील 

  वादग्रस्त ऑडिओ क्लिप भोवली, आदित्य ठाकरेंसाठी सुनील शिंदेंनी वरळी मतदारसंघ सोडला होता

  16:14 (IST)

  रत्नागिरी - खेड आणि परिसरात जोरदार पाऊस
  परशुराम घाटात कंटेनर घसरल्यानं एकेरी वाहतूक
  अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी

  16:2 (IST)

  नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ गायकवाडांची आत्महत्या, राहत्या घरात गळफास घेऊन संपवलं जीवन, कमी पगार आणि कर्जाला कंटाळून टोकाचं पाऊल, महिनाभरापासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनातही सहभागी होते, गहिनाथ गायकवाड मूळच्या बीडमधील रहिवासी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स