LIVE: भिवंडी तालुक्यातील तानसा नदीला पूर, 10 ते 12 गावपाड्यांचा संपर्क तुटला

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 19, 2021, 19:14 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:1 (IST)

  नाशिक रोड प्रभाग सभापती निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक गैरहजर, शिवसेनेचे प्रशांत दिवे झाले सभापती
  , गैरहजर सदस्य माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक, आजी-माजी आमदारांच्या संघर्षाचा भाजपला फटका

  21:36 (IST)

  नागपूर विद्यापीठाचा शुल्कमाफीचा ऐतिहासिक निर्णय
  नागपुरातील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा
  महाराष्ट्रात शुल्कमाफी घोषणा करणारं पहिलं विद्यापीठ

  21:23 (IST)

  प्रत्येक पालखीतील 30 वारकरी विसावा ते पंढरपूर पायी चालत जाणार

  21:17 (IST)

  'अतिवृष्टीचा इशारा असल्यानं उद्या कामावर हजर राहा'
  ठाणे महापालिकेनं सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना

  20:29 (IST)

  ठाणे - कळव्यातील घोलाईनगर दुर्घटना प्रकरण
  'धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांचं त्वरित स्थलांतर करा'
  पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाणे पालिकेला आदेश
  दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख रुपयांची मदत

  19:40 (IST)

  अकरावीसाठी सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला होणार
  अकरावीसाठी सीईटी परीक्षा ऑफलाईन होणार
  सीईटी परीक्षा देणं मात्र ऐच्छिक असणार
  11 ते 1 या वेळेत 100 गुणांचा पेपर असणार
  8 भाषांपैकी एका भाषेतून परीक्षा देता येणार
  10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर असणार
  परीक्षेसाठी फॉर्म मात्र ऑनलाईन भरावा लागणार
  20 ते 26 जुलैदरम्यान ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत

  19:3 (IST)

  ठाणे - जितेंद्र आव्हाडांकडून कळव्यातील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी, अनधिकृत झोपडी बांधणाऱ्यांना आव्हाडांचा इशारा, अनधिकृत बांधकाम हा गुन्हा - जितेंद्र आव्हाड

  16:54 (IST)

  ठाणे - कळवा पूर्व परिसरातील दुर्घटना
  घोलाईनगर टेकडीची दरड झोपड्यांवर कोसळली
  तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश
  5 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक घरांचं नुकसान
  परिसरातील 150 कुटुंबांना केलं स्थलांतरित
  पावसाचा जोर अधिक वाढल्यानं बचावकार्य थांबवलं
  भाग खचत असल्यानं TDRF जवान घटनास्थळी थांबून
  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड घटनास्थळी
  आव्हाडांनी दुर्घटनाग्रस्त भागाची केली पाहणी
  स्थलांतरित केलेल्या लोकांची विचारपूस

  16:28 (IST)

  भिवंडी तालुक्यात काल संध्याकाळपासून मुसळधार
  भिवंडी परिसर जलमय, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं
  मुंबईला पाणीपुरवठा करणारं पिसे धरण ओव्हरफ्लो

  16:25 (IST)

  रत्नागिरी - खेडमधील जगबुडी, नारंगी नदीला पूर
  काही भागांमध्ये जगबुडी नदीचं पाणी शिरलं
  नारंगी नदीच्या पुराचं पाणी साचल्यानं राज्यमार्ग बंद
  खाडीपट्टा विभागाला जोडणारे अंतर्गत रस्ते पाण्यात
  मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स