विधानसभा अध्यक्ष निवडीवर जास्त चर्चा करण्याची गरज नाही,
राज्यपालांनी सुद्धा निवड करण्याबाबत आम्हाला पत्र पाठवलं आहे
बाळासाहेब थोरात यांचं विधान
निवडीबाबत आम्ही नियमात बदल केले, मात्र ते चुकीचे नाही
ज्या पद्धतीने लोकसभा राज्यसभेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होते तशा पद्धतीने निवड केली जाणार आहे
राज्यपाल नियमांना पाठींबा देतील असं मला वाटतं
लवकरच आम्ही वरिष्ठ नेतृत्वाला नाव देणार असून ते अंतिम निर्णय घेतील
बाळासाहेब थोरांताची प्रतिक्रिया
मुंबई-गोरेगाव पूर्वेतील मनसे कार्यालयाचं उद्घाटन
वॉर्ड अध्यक्ष विजय बोरांच्या कार्यालयाचं उद्घाटन
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते झालं उद्घाटन
उद्घाटन कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी नव्हती
गोरेगाव पोलिसांनी आयोजकांवर दाखल केला गुन्हा
कार्यक्रमात स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त उपस्थिती
अधिक वजनामुळे मनसेचा स्टेज कोसळला होता
मनसे कार्यकर्त्यांनी मीडियाला केली धक्काबुक्की
देवेंद्र फडणवीसांची मविआ सरकारवर टीका
'अनेकांकडून महाराजांच्या नावाचा फक्त वापर'
'शिवरायांच्या जयंतीला अनेक निर्बंध का लावतात?'
कळत नाही आपण कोणाच्या राज्यात? - फडणवीस
'दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना महाराजच शासन करतील'
'शिवाजी पार्क खासगी मालमत्ता आहे असं वागतात'
मविआ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - शेलार
राज्यात मोगलाई आहे का असा प्रश्न - आशिष शेलार
'मराठा आरक्षणाबाबत सरकार स्पष्टता आणत नाही'
मविआ सरकार आलं आणि आरक्षण गेलं - शेलार
प्रवीण दरेकरांची मविआ सरकारवर टीका
'सरकार केवळ राजकारणासाठी शिवरायांचं नाव घेतं'
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंदवडे - प्रवीण दरेकर
बोलाची कडी, बोलाचा भात; असा कारभार - दरेकर
रामदास आठवलेंची 'मविआ'वर कवितेतून फटकेबाजी
शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा - आठवले
वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा - रामदास आठवले
शिवाजी पार्क पुढच्यावेळी पूर्ण भरलेलं असेल - राज्यपाल
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनावर मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल
शिवजयंती निमित्ताने मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते आज कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं
या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नसल्यामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
गोरेगावमध्ये मनसेचे वॉर्ड अध्यक्ष विजय बोरा यांच्या आज कार्यालयाचे उद्घाटन आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा हस्ते झालं, या उद्घाटनमध्ये स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त वजन वाढल्यामुळे स्टेज कोसळला होता
स्टेज कोसळल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी माध्यमांना कवरेज करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :
शिवाजीपार्क येथे विनायक मेटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. तुमचं मनापासून अभिनंदन, दिमाखदार सोहळा केलात
कारणे अनेक दिलेत, महाराजांच्या जयंतीला अनेक निर्बंध लावलेत
कळतं नाही की कोणाच्या राज्यात आहे
अनेक लोक फक्त महाराजांच्या नावाचा वापर करता
वागण्यात मात्र सगळं विसरतात
संघर्ष हा सुरूच राहील, शिवाजी महाराजांचे रक्त प्रत्येकाचा मनात
सामान्य मानसाचा विजय होईल
जे लोकं महाराजांचे सोहळे रोखतात, दुटप्पी भुमिका घेतात यांना महाराजच शासन करतील
विनायक मेटे यांच्या भाषणातील मुद्दे :
शिवाजी पार्कात महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याव्यतिरिक्त कार्यक्रम झाला नाही
हे मैदान शिवाजी महाराजांच्या जयंतीला उपलब्ध होत नाही ही शोकांतिका
राज्यपालांना विनंती हे मैदान 19 फेब्रुवारीसाठी राखीव ठेवा
अनेक कार्यक्रम करणार होतो पण परवानगी दिली नाही
शासनाला, प्रशासनाला महाराजांबद्दल राग का?
शिवाजी महारांच्याबाबत राजकरण होऊ शकत नाही
घरात बसून बांगड्या भरुन बोलण्याचे काम आम्ही करत नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोरखेळ सरकारने चालवला आहे
हे सरकार कधी जाईल हे कळणार नाही