LIVE Updates: नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुंबईत 7 ठिकाणी गुन्हे दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | August 19, 2021, 22:38 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    22:1 (IST)

    मुंबईत नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा
    मुंबईत 7 ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल
    विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर
    चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल

    21:30 (IST)

    बैलगाडा शर्यतीच्या बंदीवर फेरविचार व्हावा - थोरात

    20:44 (IST)

    ही बेकारी वाढणारी थांबवली पाहिजे - नारायण राणे
    यासाठी उद्योग उभारले गेले पाहिजेत - नारायण राणे
    'मी केंद्रात पहिल्यांदा मंत्री जरी झालो असलो तरी...'
    राज्यात विविध खात्यांचा कारभार सांभाळलाय - राणे
    'लालबागमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणूस राहतो'
    'मात्र अजून येथील नागरिकांची आर्थिक प्रगती नाही'
    जनआशीर्वाद यात्रेत उदंड प्रतिसाद - नारायण राणे
    'माझ्याकडे जनतेचे आभार मानायला शब्द नाहीत'
    'GDP वाढल्यास माझ्या खात्यात महत्वपूर्ण योगदान'
    मला असंख्य उद्योजक निर्माण करायचेत - राणे
    राणेंनी घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन
    साहेब, तुम्ही आज हवे होता - नारायण राणे
    स्मारकाच्या इथं सुशोभीकरण केलेलं नाही - राणे
    गोमूत्र शिंपडणं हे काही कार्य केलं का? - राणे
    'उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मनाचं शुद्धीकरण करावं'
    'मुंबई जागतिक कीर्तीचं म्हणून डेव्हलप का नाही?'
    32 वर्षांत ही मुंबई सिंगापूर का केली नाही? - राणे
    काम करण्यासाठी कर्तृत्व लागतं - नारायण राणे
    'साहेबांच्या नावानं एकतरी विधायक कार्य केलं का?'
    मी सिंधुदुर्गात कॉलेज, हॉस्पिटल उभारलंय - राणे

    20:8 (IST)

    'एकीकडे बाळासाहेबांबद्दल आस्था दाखवायची'
    'दुसरीकडे त्यांच्या मुलाचं चरित्रहनन करायचं'
    ही कुठली भक्ती? - किशोरी पेडणेकर
    मुंबईच्या महापौरांचा नारायण राणेंना सवाल
    'शुद्धीकरण ही तमाम शिवसैनिकांची भावना'

    19:48 (IST)

    जळगाव -  हतनूर धरणाचे 6 दरवाजे पूर्णपणे उघडले, 19 हजार 700 क्युसेक पाण्याचा तापी नदीपात्रात विसर्ग

    19:46 (IST)

    पुणे - रुग्णालयाबाहेर सुरेश पिंगळेंच्या नातेवाईकांचा आक्रोश, आम्हाला न्याय मिळेपर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही, नातेवाईकांची भूमिका

    19:9 (IST)

    आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू
    पुणे पोलीस आयुक्तालयासमोर घेतलं होतं पेटवून
    गंभीर जखमी सुरेश पिंगळेंचा उपचारादरम्यान मृत्यू

    18:35 (IST)

    'सत्तेसाठी जवळीक केलेल्यांनी नौटंकी करू नये'
    शुद्धीकरणावरून आशिष शेलारांचा हल्लाबोल

    18:29 (IST)

    बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण
    राणेंनी दर्शन घेतल्यानंतर स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण
    शिवसैनिकांकडून स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण
    शिवसैनिकांनी दुग्धाभिषेक आणि गोमूत्र शिंपडलं
    स्मृतिस्थळी साफसफाई करून चाफ्याची फुलं वाहिली

    18:0 (IST)

    नारायण राणेंनी चेंबूरमध्ये नो प्लास्टिक बॅग, युज कॉटन बॅग शिल्पाचं केलं उद‌्घाटन

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स