liveLIVE NOW

LIVE: आज राज्यात 10373 रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 95.76 टक्के

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 19, 2021, 21:43 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  20:43 (IST)

  शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन सोहळा
  उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद
  'शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक बलवान'
  'आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्वाचं'
  'सत्ता गेल्यानं अनेकांचा जीव कासावीस'
  उद्धव ठाकरेंचा विरोधकांना जोरदार टोला
  'मविआच्या कामामुळे अनेकांना पोटदुखी'
  'गरज पडेल तेव्हा राजकीय औषध देणार'
  'अनेकांचे रंग, अंतरंगही शिवसेनेनं पाहिले'
  स्वबळावर लढणं आमचा हक्क - उद्धव ठाकरे
  'स्वबळ केवळ निवडणुकांसाठी असू नये'
  'स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं'
  'अन्यायाविरोधात लढण्यासाठी स्वबळ हवं'
  संकटांच्या छाताडावर चालून जा - उद्धव ठाकरे
  'संकटांना घाबरणारा शिवसैनिक कसला?'
  हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व - उद्धव ठाकरे
  'हिंदुत्वाच्या रूपात देशाला आधार दिला'
  'संकट येतं तेव्हा शिवसेना पुढे सरसावते'
  माझा देश आधी, मग महाराष्ट्र - उद्धव ठाकरे
  हिंदुत्व हे कुणाचं पेटंट नाही - उद्धव ठाकरे
  हिंदुत्वाची धरसोड होत नाही - उद्धव ठाकरे
  'ममतादीदींनी बंगालची ताकद दाखवून दिली'
  'हल्ले झेलून बंगाली माणसानं निर्भिड मत मांडलं'
  स्वत्व काय असतं हे बंगालनं दाखवलं - उद्धव ठाकरे
  'प्रादेशिक अस्मिता कशी जपायची हे दाखवलं'
  उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचं कौतुक
  'वंदे मातरम्' हा क्रांतीचा महामंत्र - उद्धव ठाकरे
  घराबाहेर न पडता काम करून दाखवलं - उद्धव ठाकरे
  'रक्तपात नव्हे, रक्तदान करणारे शिवसैनिक ही ओळख'
  'शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता रक्तदानं केलं'
  आमचं रक्तदान सर्वधर्मीयांसाठीच - उद्धव ठाकरे
  देशात राजकारणाचं विद्रुपीकरण झालंय - उद्धव ठाकरे
  कोरोना काळात किळसवाणं राजकारण - उद्धव ठाकरे
  विरोधक आरोप करून पळून जातात - उद्धव ठाकरे
  प्रत्येक घर,गाव,शहर, कोरोनामुक्त करा - उद्धव ठाकरे
  प्रत्येकानं कोरोनामुक्तीची शपथ घ्यावी - उद्धव ठाकरे
  'सत्ता, स्वबळ बाजूला ठेवून कोरोनावर लक्ष द्या'
  सत्तेसाठी लाचार होणार नाही - उद्धव ठाकरे
  कुणाची पालखी उगाच वाहणार नाही - उद्धव ठाकरे
  स्वत:च्या हिमतीवर शिवसेना पुढे चालेल - उद्धव ठाकरे

  20:2 (IST)

  राष्ट्रवादीच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयाचं उद‌्घाटन
  अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद‌्घाटन
  अजितदादांनी आवाहन करूनही कार्यकर्त्यांची गर्दी
  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नियमांचे तीनतेरा 
  नियमांचं पालन करून कार्यक्रम व्हावेत -अजितदादा
  गर्दीवरून अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी 

  18:50 (IST)

  राष्ट्रवादीच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयाचं उद‌्घाटन
  अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद‌्घाटन
  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कार्यक्रमस्थळी गर्दी
  अजित पवारांनी आवाहन करूनही गर्दी कायम
  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नियमांचे तीनतेरा 
  नियमांचं पालन करून कार्यक्रम व्हावेत -अजितदादा
  गर्दीवरून अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी 

  18:10 (IST)

  राष्ट्रवादीच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयाचं उद‌्घाटन
  अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद‌्घाटन
  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कार्यक्रमस्थळी गर्दी
  अजित पवारांनी आवाहन करूनही गर्दी कायम 

  17:50 (IST)

  महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांचं वक्तव्य
  'मुंबईतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची स्वबळाची मागणी'
  सकारात्मक विचार केला जाईल - एच.के. पाटील 
  'भाई जगताप हायकमांडकडे प्रस्ताव घेऊन येतील'
  'मात्र निर्णय मुंबई महापालिकेपुरता मर्यादित असेल'
  'राज्यस्तरावरील निवडणुकांना अजून वेळ आहे'
  त्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल - एच.के. पाटील  

  17:13 (IST)

  'नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4.74'
  बेड्स फक्त 9 टक्के भरले - छगन भुजबळ
  '155 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचं नियोजन'
  'नाशिक शहरातील मॉल्स सोमवारपासून खुले'
  'दुपारी 4 पर्यंत मॉल्स खुले ठेवण्यास परवानगी'
  मॉल्समध्ये फक्त 50 टक्के उपस्थिती - भुजबळ
  कोरोना निकष पाळणं बंधनकारक - भुजबळ
  'आणखी 8 दिवस परिस्थितीचा अंदाज घेणार'
  नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांची माहिती 

  17:12 (IST)

  मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचची मोठी कारवाई
  पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केली हत्यारं
  10 पिस्तुलं आणि जिवंत काडतुसं केली जप्त
  क्राईम ब्रँचनं मुलुंडमधून एकाला केली अटक 

  17:12 (IST)

  कर्नाटक-अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग
  कोल्हापूर, सांगलीला करावा लागतो पुराचा सामना
  उपाययोजनेसाठी जयंत पाटील-येडियुरप्पांची बैठक
  जयंत पाटलांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट
  'अलमट्टीविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा'
  'पूरनियंत्रणासाठी कसं काम करावं याबाबत चर्चा'
  पुराचा तडाखा बसू नये यासाठी प्रयत्नशील - पाटील
  महाराष्ट्र-कर्नाटक जलसंपदा विभागाची झाली बैठक 

  14:16 (IST)

  'पुणे शहर,जिल्ह्यातील आधीचे निर्बंध कायम'
  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट
  'शनिवार, रविवारी अत्यावश्यक सुविधाच सुरू'
  'वीकेंडला लोक घराबाहेर पडून गर्दी करतात'
  तिसऱ्या लाटेचा धोका कायम - अजित पवार
  'पुणे शहर दुसऱ्या, पिंपरी-चिंचवड तिसऱ्या टप्प्यात'
  पुणे ग्रामीण चौथ्या टप्प्यात - अजित पवार
  'निवडणूकवेळी कोण कुणासोबत हे कळेल'
  किमान समान कार्यक्रम हेच तत्व - अजित पवार
  प्रत्येकाला पक्षवाढीचा अधिकार - अजित पवार

  11:43 (IST)

  लोणावळ्यातील पर्यटकांवर पोलिसांची कारवाई
  भुशी डॅमवरील पर्यटकांना पाठवलं माघारी
  भुशी धरण परिसर पोलिसांनी केला मोकळा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स