• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : मोदी सरकारविरोधात मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि थोरातही मैदानात

LIVE : मोदी सरकारविरोधात मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि थोरातही मैदानात

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 19, 2021, 18:19 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:6 (IST)

  मराठा आरक्षणावर उद्यापासून सुनावणी, मराठा आरक्षणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार, 25 तारखेची मराठा आरक्षण सुनावणी उद्याच होणार

  20:12 (IST)

  मविआचा मोर्चा ढोंगीपणा आहे -फडणवीस
  काँग्रेस सर्वात मोठी ढोंगी -देवेंद्र फडणवीस
  'या सरकारकडून मोठी वीजबिल वसुली'
  'जो कायदा 2006 मध्ये राज्यात केला'
  'तो केंद्रानं केला त्यालाच विरोध होतोय'
  'ग्रा.पं.मध्ये कोण जिंकलं हे सर्वांना माहीत'
  भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष -फडणवीस
  'बाळासाहेबांच्या पुतळ्याला विरोध अयोग्य'
  तो पुतळा तिथंच राहिला पाहिजे -फडणवीस
  'स्टिअरिंग माझ्याकडे आहे सांगून काय उपयोग?'
  'स्टिअरिंग कुणाकडे आहे हे सर्वांना माहीत'
  शिवसेनेचं मतांसाठी लोटांगण -फडणवीस
  'हिंदुत्ववादी पक्ष म्हणणं सोडून दिलं पाहिजे'
  देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

  19:56 (IST)

  'शक्ती कायद्यासंदर्भात सूचना आणि निवेदनं'
  'मुंबईतील महिला, वकील संघटनांकडून सूचना'
  'समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करणार'
  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

  19:47 (IST)

  संगमनेर तालुक्याच्या कोठे कमळेश्वर गावातील घटना, दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा महिलेचा खून, दागिने लुटण्याच्या उद्देशानं केला हल्ला, विरोध केल्यानं महिलेचा केला खून, हल्ल्यात 4 वर्षांची मुलगीही जखमी

  19:32 (IST)

  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचं सौंदर्यीकरण जूनपर्यंत करावं, पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबई महापालिकेला सूचना

  19:7 (IST)

  ग्राहकांनी थकबाकी भरावी, महावितरणचं आवाहन
  थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार
  ऊर्जा मंत्रालयाचा वीज ग्राहकांना इशारा
  लॉकडाऊनमध्ये केलेली वीज सवलतीची भाषा

  18:50 (IST)

  औरंगाबादच्या नामांतर कॅबिनेटमध्ये आणण्याआधी मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करणार, बाळासाहेबांची इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्ण करतील, पण मित्रपक्षांसोबत समन्वय करून निर्णय घेतला जाईल -अब्दुल सत्तार

  18:33 (IST)

  केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे राज्यातील साखर कारखान्यांना कर्ज पुनर्गठणाचा लाभ नाही, केंद्राला पुन्हा फेरप्रस्ताव सादर करणार, राज्य साखर संघटनेच्या पुण्यातील बैठकीत निर्णय

  18:7 (IST)

  शेतकरी कायद्याविरोधात आक्रमक
  राज्यातील सर्व पक्ष एकत्र येणार -मलिक
  'आझाद मैदानात 25 तारखेला रॅली'
  'उद्धव ठाकरे, शरद पवार सामील होणार'
  थोरातही रॅलीत सहभागी होणार -नवाब मलिक

  17:47 (IST)

  'ग्रामपंचायत सरपंचपदाची सोडत लवकरच'
  महिनाभरात सोडत काढण्याच्या सूचना -मुश्रीफ
  31 मार्चपर्यंत ग्रामसभा पुढे ढकलल्या -हसन मुश्रीफ

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स