LIVE Updates: नाशिकमध्ये ललित हायड्रोलिक कंपनीत भीषण स्फोट, 6 जण भाजले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 18, 2021, 19:27 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:30 (IST)

  लालबाग गणेश मंडळ आणि पोलिसांची बैठक संपली
  लालबाग राजाच्या दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवाहन
  उद्या स.10.30 वा. विसर्जन मिरवणूक सुरू होणार
  गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा विसर्जित होणार

  20:46 (IST)

  नालासोपारा - भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मारहाण करणाऱ्या भोंदूबाबावर 2 दिवसांनंतर गुन्हा दाखल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात केली होती तक्रार

  20:17 (IST)

  पुण्यातील महिला सुरक्षेच्या मुद्यावर झाली बैठक
  पुणे पालिका आणि पोलीस प्रशासनाची झाली बैठक
  'फुटपाथवर राहणाऱ्या बेघर कुटुंबांचं सर्वेक्षण हाती घेणार'
  परप्रांतीयांची नोंद ठेवण्यासंबंधीही बैठकीत चर्चा - महापौर
  पुणे शहरात सीसीटीव्हीचं जाळं वाढवण्यावरही चर्चा - मुरलीधर मोहोळ

  20:12 (IST)

  'यावर्षीही पुणेकरांनी घरच्या घरीच बाप्पाला निरोप द्यावा'
  मूर्तिदानासाठीही पालिकेच्या वतीनं फिरते हौद - महापौर

  20:10 (IST)

  आगामी निवडणुका जिंकण्याचा बैठकीत निर्धार - राणे
  हे सरकार कोणत्याही क्षणी पडेल - नारायण राणे
  'संजय राऊत कोण? त्यांच्या प्रश्नाला मी का उत्तर देऊ?'
  केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

  19:21 (IST)

  'संजय राऊतांच्या अंगात आल्यामुळेच मविआ झाली'
  कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमांच्या विधानामुळे हास्याचे फवारे
  ग्रामीण भागातील संकल्पना सांगत राऊतांचं कौतुक
  सोलापूर कॉंग्रेस भवनातील मेळाव्यात केलं विधान 
  'प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रिमंडळात नसल्यानं खंत'
  मात्र कदाचित लवकरच त्या कॅबिनेट मंत्री होतील - कदम

  19:18 (IST)

  नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना
  ललित हायड्रोलिक कंपनीत भीषण स्फोट
  6 जण भाजले, अग्निशमन दल घटनास्थळी

  18:58 (IST)

  येणाऱ्या सर्व निवडणुका भाजपनं जिंकायच्या आहेत हा निर्धार बैठकीत केला - नारायण राणे

  17:33 (IST)

  मुंबई मोठं शहर, कायम अलर्ट, रेल्वे पोलीस सतर्क, गस्त घालणे, मॉकड्रील, वाहनांची तपासणी सुरूच, पार्सलसेवा, गॅस अॅटॅक, वाहन धडकेसारख्या घटनांवर विशेष नजर, सीसीटीव्हीची सतत पाहणी, पोलीस जागृत आहेत, जनतेनंही सतर्क राहावं, संशयास्पद घटना तात्काळ कळवा - रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद

  17:31 (IST)

  मुंबई मोठं शहर, कायम अलर्ट - कैसर खालीद
  रेल्वे पोलीस सतर्क - रेल्वे पोलीस आयुक्त
  'गस्त घालणे, मॉकड्रील, वाहनांची तपासणी सुरूच'
  'पार्सलसेवा, गॅस अॅटॅक, वाहन धडकेसारख्या घटनांवर नजर'
  सीसीटीव्हीची सतत पाहणी - कैसर खालीद
  'पोलीस जागृत आहेत, जनतेनंही सतर्क राहावं'
  संशयास्पद घटना तात्काळ कळवा - रेल्वे पोलीस आयुक्त

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स