Live Updates: मुंबईमध्ये आज कोरोनामुळे मृत्यूची संख्या शुन्य!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 18, 2021, 22:48 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:49 (IST)

  राज्यात आणखी 8 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण
  मुंबई विमानतळ निरीक्षण क्षेत्रात 4 रुग्ण आढळले
  साताऱ्यात 3 आणि पुणे मनपा क्षेत्रात एक रुग्ण
  आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 48 रुग्ण

  20:2 (IST)

  राज्यातील आरोग्य आणि म्हाडा भरती पेपरफुटी घोटाळा
  पेपरफुटी घोटाळ्यातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
  आरोग्य भरती घोटाळ्यातील आरोपींना 20 तारखेपर्यंत कोठडी
  म्हाडा भरती घोटाळ्यातील आरोपींना 23 तारखेपर्यंत कोठडी 

  19:45 (IST)

  आज मुंबईत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही
  डिसेंबरमध्ये तिसऱ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद
  यापूर्वी 11 आणि 15 डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद 

  16:18 (IST)

  'शासकीय भरती महाघोटाळ्याची व्याप्ती मोठी'
  भांडाफोड झाल्यानं अनेक दलाल फरार - पोलीस
  'आरोग्य, म्हाडा, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण'
  'दलालांना पैसे दिलेल्यांनी स्वत:हून माहिती द्यावी'
  'आम्ही 'त्या' परीक्षार्थींना आरोपी करणार नाही'
  'मात्र तपासात नावं उघड झाल्यास नाईलाज होईल'
  पुणे सायबर डीसीपी भाग्यश्री नवटकेंचं आवाहन 

  16:11 (IST)

  अमित शाहांनी शिर्डीत घेतलं साईबाबांचं दर्शन

  16:3 (IST)

  शिवसेना नेते रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर परिवहन मंत्री अनिल परबांचं मौन; मी काहीही बोलणार नाही - अनिल परब

  रामदास कदमांवर उदय सामंत यांची सावध प्रतिक्रिया; रामदास कदम हे ज्येष्ठ नेते; त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही - उदय 

  सामंत

  शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची रामदास कदमांवर टीका; रामदास कदम शिवसेनेतले सर्वात मोठे गद्दार; 2014 

  च्या विधानसभा निवडणुकीत मला पाडलं; रामदास कदमांनी अनंत गीतेंविरोधात प्रचार केला - सूर्यकांत दळवी 

  15:53 (IST)

  महाराष्ट्रातील शासकीय भरती महाघोटाळ्याची व्याप्ती मोठी; भरती महाघोटाळ्याचा भांडाफोड झाल्यानं अनेक दलाल फरार; आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षा घोटाळ्यात दलालांना पैसे दिलेल्या परीक्षार्थींनी स्वत:हून पुढे येऊन माहिती दिल्यास आम्ही त्यांना आरोपी करणार नाही अन्यथा पुढे तपासात नावं उघड झाल्यास आमचा नाईलाज होईल; पुणे सायबर डीसीपी भाग्यश्री नवटके यांचं परीक्षार्थींना आवाहन 

  15:45 (IST)

  औरंगाबाद ब्रेकिंग

  औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहती मध्ये स्फोट

  गॅस वेल्डिंग दुकानांवर स्फोट

  स्फोटात दोन गंभीर जखमी

  स्फोटात ऐकून चार जण जखमी

  मोटार सायकल ची वेल्डिंग करतांना झाला स्फोट

  गॅस च्या टाकीचा स्पॉट

  जखमींना हलवले घाटी रुग्णालयात

  15:2 (IST)

  सिंधुदुर्ग - माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला
  करंजेचे माजी सरपंच संतोष परबांवर हल्ला
  जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक
  कणकवलीत नरडवे रोडवर रेल्वे स्टेशनजवळ हल्ला
  हल्लेखोरांनी कारनं मोटरसायकलला मागून दिली धडक
  खाली कोसळताच संतोष परबांवर धारदार शस्त्रानं हल्ला
  संतोष परब हे सतीश सावंत यांचे खंदे समर्थक 

  14:55 (IST)

  केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर 
  अमित शाह अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगरात
  प्रवरानगरात देशातील पहिली सहकार परिषद
  अमित शाह यांच्या उपस्थितीत सहकार परिषद
  शिवरायांच्या भूमीत आलो हे माझं भाग्य - अमित शाह
  'अमित शाहांचं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन'
  शिवरायांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली - शाह
  प्रवरानगर ही सहकार आंदोलनाची काशी - अमित शाह
  डॉ.पद्मश्री विखे पाटलांनी सहकाराचा पाया रचला - शाह
  'सबका साथ, सबका विकास हे सहकारानं यशस्वी होईल'
  स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांनंतर केंद्रात सहकार मंत्रालय - शाह
  सहकार चळवळीसाठी मोदी नेहमीच प्रयत्नशील - शाह
  सहकाराला मदत करण्यासाठी सहकार मंत्रालय - शाह
  'महाराष्ट्रात फक्त एक सहकारी कारखाना नीट सुरू'
  सहकारात पारदर्शकता आणावी लागेल - अमित शाह
  तरुणांना सहकारात आणावं लागेल - अमित शाह
  आता सहकारावर अन्याय होणार नाही - अमित शाह
  'मी साखर कारखाने तोडायला नव्हे जोडायला आलोय'
  'मी सहकारमंत्री झाल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले'
  'सहकाराविषयी कोणीही सल्ले देण्याचं काम करू नये'
  केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहांची राज्य सरकारवर टीका
  माझ्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:कडे पाहा - अमित शाह
  हजारो कोटींचे घोटाळे रिझर्व्ह बँकेनं केले का? - अमित शाह
  अमित शाहांची राज्यातील विरोधकांवर नाव न घेता टीका
  'विरोधकांनी सहकार चळवळीला वाचवण्यासाठी पुढे यावं'
  'साखर कारखाने चालू राहावेत यासाठी योजना तयार'
  साखर कारखान्यांच्या समस्या सोडवणार - अमित शाह
  महाराष्ट्रातील जिल्हा बँकांची स्थिती वाईट - अमित शाह
  जिल्हा बँका वाचवण्यासाठी प्रयत्न करणार - अमित शाह
  'बँकांसाठी कोणतीही समिती बनवण्याची गरज नाही'
  तज्ज्ञांशी चर्चा करून प्रश्न सोडवणार - अमित शाह
  लवकरच सहकार विद्यापीठ स्थापन करणार - अमित शाह 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स