LIVE NOW

LIVE: उद्यापासून राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | June 18, 2021, 11:07 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated June 18, 2021
auto-refresh

Highlights

8:17 pm (IST)

राज्यात दिवसभरात 14,347 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 9,798 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 198 रुग्णांचा मृत्यू
रिकव्हरी रेट 95.73 तर मृत्युदर 1.96%
राज्यात सध्या 1 लाख 34,747 अॅक्टिव्ह रुग्ण

7:03 pm (IST)

पुणे - अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यात इतर दुकानं ब्युटीपार्लर, स्पा, मॉल, हॉटेल शनिवारी, रविवारी बंदच राहणार, हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये शनिवारी, रविवारी पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहणार, अत्यावश्यक सुविधा सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सातही दिवस सुरू राहणार; पुण्यात नाट्यगृहं, चित्रपटगृहं सुरू करण्याबाबत सुधारित आदेशात उल्लेख नाही

6:38 pm (IST)

सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा - मुख्यमंत्री
समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या - मुख्यमंत्री

6:14 pm (IST)
आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात सरकारला धारेवर धरू; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
5:53 pm (IST)

'सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झालाय'
'सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्यावरून तिसऱ्या टप्प्यात'
सिंधुदुर्गात दुकानं 4 पर्यंत खुली राहतील - उदय सामंत

5:50 pm (IST)

साताऱ्यात अनलॉकला सुरुवात, सोमवार ते शुक्रवारी सकाळी 9 ते 4 पर्यंत सर्व दुकानं सुरू ठेवता येणार, साताऱ्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू, सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

5:48 pm (IST)

मुंबई जरी लेव्हल 1 मध्ये आली असली तरी निर्बंध मात्र सध्याचेच लेव्हल तीनचेच राहतील, पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ, सर्व गोष्टींचा विचार करून टप्प्याटप्प्यानं निर्बंध दूर केले जातील, तज्ज्ञांनी दोन-चार आठवड्यांत तिसरी लाट येईल, असा अंदाज दर्शवला आहे, त्यामुळे त्याची पूर्वतयारी करायचीय व अधिक सतर्कता बाळगायची, त्यामुळे लोकल प्रवासासाठी अधिक कळ सोसावी लागेल - सुरेश काकाणी

5:46 pm (IST)

दहावीच्या मार्कलिस्टच्या आधारेच तंत्रशिक्षण विभागाचं अॅडमिशन, पॉलिटेक्निकचं अॅडमिशन, दहावीनंतर अॅडमिशनसाठी CET घेणार नाही - उदय सामंत

5:26 pm (IST)

'नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव द्यावं'
अशी भाजपची भूमिका; प्रवीण दरेकरांचं वक्तव्य

5:25 pm (IST)

मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेन उभारा, अशोक चव्हाणांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स