घरी विलगीकरणासह लग्नसमारंभ, सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे सक्त आदेश
पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या इमारती करणार सील, होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या हातावर मारणार शिक्के
मुंबईत विनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी नेमणार 300 मार्शल, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी मार्शल्सची संख्या होणार दुप्पट, दररोज 25 हजार जणांवर कारवाईचं लक्ष्य
मंगल कार्यालयं, क्लब, उपाहारगृहं इत्यादी ठिकाणी धाडी टाकण्याच्या मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या सूचना
ब्राझीलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्थात्मक विलगीकरणात, कोरोना रुग्ण वाढत असलेल्या विभागांमध्ये तपासण्यांची संख्या वाढवणार -इक्बालसिंह चहल