Live Updates : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजप कोअर कमिटीची बैठक सुरू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | October 17, 2021, 16:12 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    21:28 (IST)

    मुख्यमंत्र्यांची उद्या 3 वा. कोविड टास्क फोर्सशी बैठक
    नगर आणि इतर काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
    सुरक्षित जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेसंदर्भात करणार चर्चा
    सुरक्षित उपायांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करणार
    निर्बंध उठवण्यावर महत्वाची चर्चा होण्याची शक्यता
    राज्य अनलॉक करण्याबाबत बैठकीत चर्चा करणार

    20:29 (IST)

    उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उद्या बैठक
    'सह्याद्री'वर उद्या दु.12.30 वाजता बैठक होणार
    बैठकीत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार
    पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत चर्चा होणार
    राज्य पूर्णपणे अनलॉक करून अर्थव्यवस्थेवर चर्चा
    कोरोनावर नियंत्रणासंदर्भात बैठकीत चर्चा करणार
    पुढील वाटचालीबाबत बैठकीत भूमिका ठरवणार
    तपास यंत्रणा, विरोधकांच्या राजकारणावरही चर्चा?

    19:24 (IST)

    मी बाळासाहेबांना भेटले होते - गुरू माँ कांचन गिरी
    'सेनाप्रमुखांच्या भेटीवेळी खूप प्रभावित झाले होते'
    'राज ठाकरेंच्या हिंदुत्वाबद्दलही मी ऐकलं आहे'
    राज ठाकरे मनानं कट्टर हिंदू आहेत - गुरू माँ
    हिंदू राष्ट्राच्या निर्माणासाठी मी भेटणार - गुरू माँ
    'राज ठाकरे हिंदुत्वासाठी सिंहगर्जनेसारखे बोलतात'
    हिंदूंचा आवाज बुलंद करायचाय - गुरू माँ कांचन गिरी
    'राज ठाकरे-परप्रांतीय मतभेद दूर करण्याचा प्रयत्न'
    'अनेक उत्तर भारतीय तरुणांना भेट घालून देणार'
    'मी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचं निमंत्रण देणार'
    'साधू-संत-महंतांच्या हजेरीत भव्य स्वागत करणार'

    18:42 (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा
    'नागरिकांच्या समस्या जाणण्यासाठी दौऱ्यावर'
    'कोरोनात जुने सहकारी गेल्याची आठवण येते'
    देशात महागाईचा प्रश्न वाढला - शरद पवार
    पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करा - पवार
    'घरगुती गॅस वाढल्यानं बजेट कोलमडलं'
    केंद्र सरकारनं कर कमी करावेत - शरद पवार
    'कामगारांना काम देण्याची तेव्हाच्या सरकारची भूमिका'
    'आज कामावरून कधी काढतील सांगता येत नाही'
    'कारखानदारी वाढवण्याबाबत आम्ही विचार केला होता'
    केंद्र नव्या कारखान्यांबाबत उदासीन - शरद पवार
    'कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्ता वापरली'
    ...तर सगळ्यांच्या भुकेचा प्रश्न मिटवतो - शरद पवार
    आज बरोबर उलट परिस्थिती, पवारांचं टीकास्त्र
    'सुदैवानं उद्धव ठाकरेंच्या हातात राज्याची धुरा'
    'औद्योगिक धोरणांतील कामाची गरज पूर्ण करतोय'
    आज केंद्राकडून राज्याला मदत होत नाही - पवार
    'जीएसटीचे 30 हजार कोटी मिळाले नाहीत'
    'मदतीऐवजी राज्यातलं सरकार पाडायचे प्रयत्न'
    ईडी, सीबीआयचा वापर करतात - शरद पवार
    मुंबईचा पोलीस कमिशनर गायब होतो - पवार
    ही गोष्ट इतिहासात घडली नाही - शरद पवार
    'राज्यातलं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल'
    'सत्ता आहे म्हणून केंद्रातील हे सरकार असं करतंय'
    'भाजप हे देशावर आलेलं संकट, दूर केलं पाहिजे'
    पिंपरी-चिंचवडमध्ये पवारांचा भाजपवर घणाघात

    18:5 (IST)

    मविआ सरकार कार्यकाळ पूर्ण करेल - सुप्रिया सुळे
    'प्रतिकूल परिस्थितीत सरकारनं 2 वर्षं पूर्ण केल्याचं कौतुक'
    केंद्राकडून मुद्दाम त्रास, 'त्या' छाप्यासंदर्भात प्रतिक्रिया

    17:49 (IST)

    'लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काहीतरी घडवतात'
    'मुख्य गोष्टीवरून लक्ष वळवून लोकांना दुसरीकडे नेतात'
    दिलीप वळसे पाटलांची नाव न घेता भाजपवर टीका

    17:12 (IST)

    दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेची तारीख ठरली, 24 ऑक्टोबरला होणार परीक्षा, राज्यस्तरावरील 24 आणि मंडळ स्तरावरील 28 अशा एकूण 52 संवर्गासाठी होणार भरती परीक्षा, 2 हजार 739 रिक्त पदं या भरती परीक्षेनंतर भरली जाणार, एकूण 4 लाख 5 हजार 156 अर्ज झाले होते प्राप्त, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आरोग्य विभागात 100 टक्के रिक्त पदं भरण्याची दिली आहे परवानगी, न्यास एजन्सीमार्फत घेण्यात येणार भरती परीक्षा, अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांकडून झाल्या होत्या तक्रारी प्राप्त - डॉ.अर्चना पाटील

    17:1 (IST)

    नाशिक - व्यावसायिकांना दमबाजी, पोलीस मित्र असलेलं कार्ड दाखवत अधिकारी असल्याची केली बतावणी, फुकट जेवण देण्याची मागणी करत हॉटेलमध्ये घातला धिंगाणा, स्थानिक पोलिसांना फोन करताच तोतया पोलिसानं काढला पळ, नाशिकच्या इंदिरानगर इथल्या घटनेचा प्रकार CCTV मध्ये कैद

    16:5 (IST)

    उल्हासनगर - महिलेचं मंगळसूत्र चोरून धूम ठोकणाऱ्या तरुणाला विठ्ठलवाडी पोलिसांकडून अटक, मोबाईल गेममध्ये एक लाखापेक्षा जास्त रक्कम हरला, मोबाईल गेमनं झाला आयुष्याचा खेळ

    14:57 (IST)

    एक डोस घेतलेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
    सर्व क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहभागी होता येणार
    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स