• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : स्मृती इराणींविरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Live Updates : स्मृती इराणींविरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 17, 2022, 17:58 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:32 (IST)

  राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढणार - सूत्र
  गोयल, तावडे, हर्षवर्धन पाटील, महाडिक चर्चेत
  तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मतं कमी पडतात
  तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी

  22:32 (IST)

  राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढणार - सूत्र
  गोयल, तावडे, हर्षवर्धन पाटील, महाडिक चर्चेत
  तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मतं कमी पडतात
  तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी

  21:37 (IST)

  मुंबई शहरातली नालेसफाई अजून गाळातच, शहर भागात वेळेत नालेसफाई पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेची कारणे दाखवा नोटीस

  21:9 (IST)

  केतकी चितळेची 8 तास कसून चौकशी
  ठाणे गुन्हे शाखेकडून केतकीची चौकशी
  केतकीची पोलीस कोठडी उद्या संपतेय
  उद्या केतकीला कोर्टात हजर करणार

  20:45 (IST)

  आम्ही सर्व कामं करत आहोत - आदित्य ठाकरे
  'पाऊस किती पडेल यावर आमचं लक्ष आहे'
  आमचं काम बाराही महिने सुरू असतं - आदित्य
  मुंबईत 100 टक्के लसीकरण झालंय - आदित्य
  'डॉक्टरांच्या सल्ल्यानं बूस्टर डोस घेऊ शकता'
  बूस्टर डोसची तयारीही केलीय - आदित्य ठाकरे
  'निवडणुकीचा विषय आयोग, सुप्रीम कोर्ट ठरवेल'

  20:1 (IST)

  सुप्रिया सुळेंनी ज्या प्रकारे भूमिका मांडली की ज्यांनी महिलांवर हात उगारला त्याचे हात तोडू, मग सुप्रिया सुळेंनी सर्वांच्या बाबतीत अशीच भूमिका घ्यायला पाहिजे, नवनीत राणांवर कारवाई झाली किंवा इतर महिलांवर अन्याय होतो तेव्हा सुप्रिया सुळे का गप्प होत्या? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

  19:53 (IST)

  आपले गृहमंत्री असल्यामुळे आपण लोकांवर अंडी फेकली तर आपल्यावर कारवाई होणार नाही या भ्रमात राहणं योग्य नाही, आपल्याकडे लोकशाही आहे, कारवाई झाली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही - देवेंद्र फडणवीस

  19:53 (IST)

  निवडणूक आयोगाचा निवडणुकीसंदर्भात अधिकृत कार्यक्रम आल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही - देवेंद्र फडणवीस

  18:26 (IST)

  एक तासापासून मंत्र्यांचे बंगले अंधारात
  सप्लाय लाईन ट्रीप झाल्याची माहिती
  काम सुरू असल्याची माहिती
  सकाळीही लाईट गेल्याची माहिती

  18:26 (IST)

  मुंबईतील काही मंत्र्यांचे बंगले अंधारात
  मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांची बत्तीगुल
  सप्लाय लाईन ट्रीप झाल्याची माहिती
  दुरुस्तीचं काम सुरू असल्याची माहिती

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स