पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद LIVE
हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
'सरकारच्या आदेशानं कार्यभार स्वीकारला'
'मुंबई पोलीस कठीण समस्येतून जातायत'
'मुंबई पोलिसांची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न'
'सगळ्यांची मदत मला मिळेल याची खात्री'
'यापुढे मुंबई पोलिसांवर टीका होणार नाही'
'भविष्यात चांगलं पोलीस दल निर्माण करू'
पत्रकारांनी तथ्यावर बोलावं - हेमंत नगराळे
'गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग योग्य नव्हे'
NIA, ATS चा तपास योग्य होईल - नगराळे
'ज्यांनी चूक केली त्यांना योग्य शिक्षा होईल'
चालू तपासावर बोलणं योग्य नाही - नगराळे
कोणीही कमेंट करणं योग्य नाही - हेमंत नगराळे
तो तपास यंत्रणा, कोर्टाचा अधिकार - नगराळे
या प्रकरणात योग्य तपास सुरू - नगराळे
आम्ही कायद्यानुसार काम करू - हेमंत नगराळे
'राजकीय विधानांवर खुलासा करणं योग्य नाही'
'प्रसारमाध्यमातून जे काही येतंय तितकंच माहीत'
मी आता याची माहिती घेईन - पोलीस आयुक्त
खात्याअंतर्गत चौकशी होतच असते - नगराळे
'पोलीस दलात अशी कोणतीही विकृती असू नये'
'अधिकाऱ्यांनी कनिष्ठांवर लक्ष ठेवणं आवश्यक असतं'
मुंबई पोलीस दल अतिशय चांगलं - नगराळे
'26/11 असो की नैसर्गिक आपत्ती असो'
पुढे राहून मुंबई पोलिसांनी काम केलंय - नगराळे
कोल्हापूर - चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद
'यंदाचं अधिवेशन कायदा-सुव्यवस्थेबाबत गाजलं'
'सरकारला घेरल्यावर राठोडांचा राजीनामा'
'9 वेळा अधिवेशन स्थगित, पण वाझेवर कारवाई नाही'
'वाझे लादेन की त्याचा बाप आहे, हे आता कळेल'
चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला
पोलीस बदल्यांची श्वेतपत्रिका जाहीर करा - पाटील
गृहखातं नेमकं कोण चालवतं? - चंद्रकांत पाटील
अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या - चंद्रकांत पाटील
तुम्ही महाराष्ट्र असुरक्षित केलाय - चंद्रकांत पाटील
संजय राऊतांना गृहमंत्री किंवा सीएम करा - पाटील
'शोध लागलाय, बुरखे फाटायला वेळ लागणार नाही'
फडणवीसांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
'अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच'
मनसुख हिरेन यांची हत्या केली गेली - फडणवीस
'पोलीस खात्याची गाडी गुन्ह्यासाठी वापरणं गंभीर'
'90 च्या दहशतीचा प्रकार पुन्हा अनुभवला'
'महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणाचं गुन्हेगारीकरण'
युतीच्या काळात शिवसेनेकडून वाझेंना सेवेत घेण्याचा दबाव - फडणवीस
'रेकॉर्ड खराब असतानाही सेवेत घेतलं'
वाझेंचे सेनेशी अत्यंत जवळचे संबंध - फडणवीस
वाझेंनी स्कॉर्पिओ खरेदी केली - फडणवीस
पैसे न दिल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा
वसुलीच्या रॅकेटमध्ये वाझेंचं नाव - फडणवीस
'वाझेंनी गाडी पार्क करायला सांगितलं'
'गुन्हा दाखल करण्यासाठी वाझेंचा दबाव'
'गाडीत स्फोटकं सापडणं हा मोठा कट'
फडणवीसांकडून 'त्या' षड्यंत्राचा खुलासा
'मनसुखच्या हत्येनंतर मृतदेह खाडीत फेकला'
ATSच्या तपासावर फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह
एटीएस, एनआयएकडे प्रबळ पुरावे - फडणवीस
हत्येचा तपाससुद्धा NIAकडे द्यावा - फडणवीस
'हे पोलिसांचं अपयश नव्हे, सरकारचं अपयश'
वाझे, परमबीर हिमनगाचं टोक - फडणवीस
सचिन वाझे फक्त कळसूत्री बाहुलं - फडणवीस
खरे सूत्रधार शोधण्याची गरज - फडणवीस
माझ्याकडील पुरावे तपास यंत्रणेकडे - फडणवीस
बेटिंगच्या रॅकेटमध्येही वाझेंचं नाव - फडणवीस
फडणवीसांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात पाणीपुरी व नूडल्स खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला यात एक 12 वर्षीय मुलींच्या मृत्यु झाला तर 30 ते 40 नागरिकांना उलटी, ताप व पोट दुखीचा त्रास सुरू आहे . मृतक राखी सतीबावणे ही अवघ्या 12 वर्षाची होती. घटने नंतर आरोग्य विभागाची चमू भेंडला गावात झाली दाखल झाले.
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी
परमबीर सिंगांकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी
रजनीश शेठ प्रभारी पोलीस महासंचालक
राज्याच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार
संजय पांडेंकडे राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
गृहमंत्री अनिल देशमुखांची ट्विटरद्वारे माहिती
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स