• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: पुढील तीन तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

LIVE: पुढील तीन तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 17, 2021, 22:48 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:9 (IST)

  खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले धन्यवाद, आंदोलन करू नका, 
  प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं मार्ग काढण्याचे निर्देश, समन्वयासाठी एक समितीही नेमा; मुख्यमंत्र्यांची सूचना

  21:25 (IST)

  राज्यात दिवसभरात 9,830 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 5,890 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 236 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 95.64 तर मृत्युदर 1.95 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 39,960 अॅक्टिव्ह रुग्ण

  21:22 (IST)

  'रायगड इथं उभारणार बल्क ड्रग पार्क'
  स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करा - मुख्यमंत्री

  21:15 (IST)

  मराठा आरक्षणप्रश्नी 'सह्याद्री'वर झाली बैठक
  मराठा आरक्षणावर तब्बल अडीच तास मंथन
  मुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंनी केली चर्चा
  मराठा समाजाच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा
  मुख्यमंत्र्यांसमोर 6 मागण्या ठेवल्या - संभाजीराजे
  मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा - संभाजीराजे
  '36 जिल्ह्यांत मूक आंदोलनाचा मानस होता'
  आंदोलनाची सरकारकडून दखल - संभाजीराजे
  'रिव्ह्यू पिटिशन गुरुवारी दाखल करणार'
  'सारथी'साठी शनिवारी पुण्यात महत्वाची बैठक
  अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
  'गायकवाड अहवालातील त्रुटी दुरुस्त कराव्यात'
  'मराठा प्रतिनिधींना सारथी संस्थेत नियुक्त करा'
  'वसतिगृह बांधणीसाठी राज्य सरकार पैसे देणार'
  23 जिल्ह्यांत वसतिगृहं उभारणार - संभाजीराजे
  कोपर्डी प्रकरणी कोर्टात अपील करा - संभाजीराजे
  पुढील 6 महिन्यांत कारवाई करावी - संभाजीराजे
  सुपर न्यूमररीवर 14 दिवसांत निर्णय - संभाजीराजे
  आंदोलन मागे घेतलेलं नाही - संभाजीराजे छत्रपती
  मूक आंदोलन सुरूच राहणार - संभाजीराजे
  '21 जूनला नाशिकमध्ये समन्वयकांशी चर्चा'
  पुढची दिशा लवकरच स्पष्ट करणार - संभाजीराजे

  20:49 (IST)

  मराठा आरक्षणप्रश्नी 'सह्याद्री'वर झाली बैठक
  मराठा आरक्षणावर तब्बल अडीच तास मंथन
  मुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंनी केली चर्चा
  मराठा समाजाच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा
  'आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार'
  सरकार रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार - चव्हाण
  'योग्य तयारी करून कोर्टात भूमिका मांडू'
  संभाजीराजेंनी 7 मागण्या मांडल्या - अशोक चव्हाण
  '7 मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणार'
  आरक्षणावर सकारात्मक चर्चा - अशोक चव्हाण
  'अजित पवार सारथीसंदर्भात पुण्यात बैठक घेणार'
  वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू - अशोक चव्हाण

  18:54 (IST)

  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
  शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मिळाली परवानगी
  मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मुभा
  राज्य सरकारनं घेतला महत्वपूर्ण निर्णय
  शालेय शिक्षण विभागानं दिली माहिती

  16:36 (IST)

  नोवावॅक्सची लहान मुलांवर ट्रायल, जुलैपासून मुलांवर चाचणी सुरू होणार - सूत्र

  16:35 (IST)

  तळकोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम
  कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं
  कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 55 बंधारे पाण्याखाली
  गडहिंग्लज-चंदगड, कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्ग बंद
  नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
  आंबोली घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची हजेरी

  16:5 (IST)

  मुंबई - कारमायकल रोड स्फोटकं प्रकरण
  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक
  लोणावळ्याच्या रिसॉर्टमधून घेतलं होतं ताब्यात
  प्रदीप शर्माला 28 जूनपर्यंत NIA कोठडी
  मनीष सोनी, सतीश त्रिभुतकरलाही कोठडी

  15:33 (IST)

  'विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत रणनीती ठरवू'
  'मध्यावधी, भाजप-सेना एकत्र असं काही घडणार नाही'
  विशेष अधिवेशन बोलवा - चंद्रकांत पाटील
  '...तर मराठा आरक्षणासंदर्भात सांगोपांग चर्चा होईल'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स