Live Updates : महिला अत्याचाराचा मळा फुलवण्याचे काम सरकार करतंय - चित्रा वाघ 

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 16, 2021, 23:11 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:18 (IST)

  बुलडाणा - विठ्ठल मंदिरावर कोसळली वीज
  संग्रामपूर तालुक्यातल्या आवार गावातील घटना
  वीज कोसळल्यानं मंदिराच्या कळसाला तडा 

  20:35 (IST)

  सातारा - खासदार उदयनराजे भोसलेंचं ईडीला आव्हान
  'ईडीला माझी चौकशी करायची असेल खुशाल करावी'
  कारवाई करायची असेल तरच चौकशीला या -उदयनराजे
  'सगळीकडे माध्यमांना सोबत घेऊनच ईडी चौकशी व्हावी'

  20:26 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ग्रंथ प्रकाशन
  प्रबोधनकारांच्या लेखांच्या संग्रहाचं प्रकाशन
  माझ्या दृष्टीनं मुख्यमंत्री हा बहुमान - उद्धव ठाकरे
  प्रबोधनकारांचा नातू असणं हे भाग्य - उद्धव ठाकरे
  प्रबोधनकारांचे लेख आमच्या रक्तात - उद्धव ठाकरे
  'लोकशाहीत मत महत्वाचं, पण हिंमतसुद्धा लागते'
  'शिवसेना माझा 'पितृ'पक्ष, वडिलांनी स्थापन केलेला'
  माझ्याकडे प्रबोधनकारांच्या शब्दांचं धन - मुख्यमंत्री
  माझ्यात प्रबोधनकारांच्या विचारांची बीजं - मुख्यमंत्री
  आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही - उद्धव ठाकरे
  'नवहिंदू' हा प्रकार फार घातक - उद्धव ठाकरे  

  18:9 (IST)

  शरद पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
  'तयार नसलेल्यांना हात धरून राज्य कारभाराला लावलं'
  असं सांगणं म्हणजे किती हा भाबडेपणा? - फडणवीस
  'साहेब! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती 

  18:1 (IST)

  आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात सूत्रांची माहिती
  चौकशीदरम्यान आर्यनचा NCB अधिकाऱ्यांना शब्द
  मी आता सामाजिक कार्य करणार - आर्यन खान
  'मी बदलून दाखवणार, एक चांगली व्यक्ती बनणार'
  मी गोरगरीबांची सेवा करणार - आर्यन खान
  NCB, सामाजिक संस्थांकडून आर्यनचं समुपदेशन
  समीर वानखेडेंनीही केलं आर्यन खानचं समुपदेशन

  18:1 (IST)
  क्रूझ पार्टी प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई
  एनसीबीनं 1 कोटींचे अमली पदार्थ केले जप्त
  अंधेरी, वांद्रे आणि पवई परिसरात कारवाई सुरू
  एनसीबीनं काही जणांना घेतलं ताब्यात 
  17:13 (IST)

  शरद पवारांची पत्रकार परिषद
  देशातील आजची परिस्थिती वेगळी - शरद पवार
  'केंद्रातील नेत्यांना लोकांच्या प्रश्नांची आस्था नाही'
  'पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतायत'
  सामान्यांच्या प्रश्नांकडे केंद्राचं दुर्लक्ष - शरद पवार
  महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसतोय - पवार
  शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
  केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर - शरद पवार
  'सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकरचा गैरवापर'
  'भाजप सरकार नसलेली राज्यं अस्थिर करण्याचे प्रयत्न'
  '3 हजार कोटींच्या थकबाकीमुळे कोळसा पुरवठा थांबवला'
  'केंद्राकडून जीएसटीचे 35 हजार कोटी येणं बाकी'
  'अनिल देशमुखांवर आरोप झाल्यावर राजीनामा घेतला'
  'आरोप करणारे परमबीर सिंग आता कुठे आहेत?'
  'दीड-दोन वर्षांपासून ईडी कोणाला माहीत नव्हती'
  आता एनसीबी देखील तेच करतेय - शरद पवार
  'एनसीबी आडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न'
  'ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एक पंचच गुन्हेगार निघाला'
  'एनसीबी गुन्हेगारांना पंच म्हणून कसं नियुक्त करते?'
  गुन्हेगारांना हाताशी धरलं जातंय - शरद पवार
  चांगल्या लोकांना अडकवण्याचं धोरण - शरद पवार
  माझ्या कुटुंबीयांच्या घरी आयकरच्या धाडी - पवार
  'अजितदादांच्या 3 बहिणींच्या घरी तब्बल 5 दिवस छापे'
  'मध्यमवर्गीय घरात इतके दिवस छापे टाकायला लावले'
  'पाहुण्यां'ना 5 दिवस तिथंच थांबवून ठेवलं - शरद पवार
  छाप्यांचं भाजप नेत्यांकडून समर्थन कसं? - शरद पवार
  खुलासा करायला भाजपचे नेते कसे पुढे येतात? - पवार
  राज्य सरकार अस्थिर करण्यासाठीच छापासत्र - पवार
  'राज्य सरकार पडत नाही म्हणून अशा कारवाया'
  'राज्य सरकारवर दबाव आणण्याचा केंद्राचा प्रयत्न'
  केंद्रानं सूडाचं राजकारण थांबवावं - शरद पवार
  'सत्ता नसल्यापेक्षा ती गेल्याचं विरोधकांना दु:ख जास्त'
  'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याची घाई नव्हती'
  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा माझा आग्रह - पवार
  'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझा'
  'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम करताहेत'
  उद्धव ठाकरेंची कामाची पद्धत वेगळी - शरद पवार
  'सरकार 5 वर्षं पूर्ण करणार आणि पुन्हा सत्तेत येणार'
  कितीही छापे मारा, हे सरकार जाणार नाही - पवार
  'मी पुन्हा येईन' बोलणारे आता अस्वस्थ - शरद पवार
  'सत्ता नसल्यापेक्षा ती गेल्याचं विरोधकांना दु:ख जास्त'
  फडणवीसांना सत्तेशिवाय चैन पडत नाही - शरद पवार
  फडणवीसांनी वसुलीची चीप शोधून दाखवावी - पवार 

  15:49 (IST)

  जळगाव जिल्हा बँक निवडणूक
  सर्वपक्षीय पॅनलमधून कॉंग्रेस बाहेर 
  जागावाटपात अपेक्षित जागा न मिळाल्यानं निर्णय 

  14:2 (IST)

  'एनसीबीचे योद्धा झालो तर मलिकांना त्रास का?'
  फ्लेचर पटेल यांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर
  'विनाकारण कोणत्याही सैनिकाचं नाव घेऊ नका'
  'ड्रग्जविरोधात असाल तर मोहिमेला पाठिंबा द्या'
  'तुमच्या भागात कुठं काय सापडतं हे दाखवतो'
  फ्लेचर पटेल यांचं नवाब मलिकांना आवाहन

  12:7 (IST)

  वीजनिर्मिती केंद्र कोळसा घोटाळा प्रकरण
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
  कोराडी औष्णिक केंद्राची विभागीय चौकशी
  चौकशी समिती 19 ऑक्टोबरला अहवाल देणार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स